पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ प्रसन्नराघवनाटक २५ रावणाने हात टेकले त्या शिवशरासनाला हा बाणासुर काय उचलणार आहे ! हा श्लोक. कोणी हि शैव धनुकर्षणसाधनाने ।। सीताकरग्रह करील यथाविधानें ॥ नेईन राक्षस पुरी चरणा नमीन ।। प्रार्थीन फार च इला वश मी करीन ॥५०॥ मं0- मित्रा, पहा पहा. श्लोक हा बाण दैत्य निजबाहुसहस्रवेगें । ओढी परंतु न हले धनु दैवयोगें ॥ कामी 'सतीमन जसे वळवू शके ना ॥ केले जरी वचनरूप उपाय नाना ॥५९।। रा- (खिन्नहोऊन मनांत ह्मणतो.) सीता वश न होण्याचे सूचक हैं वचन कानी पडले. ( मोठ्याने बोलतो. ) अरे बाणासुरा, हे तुझे हजार हात कडब्याच्या ताटाप्रमाणे नि: सार आहेत की नाहीत ? बा०- अरे, हे माझें बाहुमंडल पाहून देखील तीक्ष्ण भाषण सोडीत नाहीस. रा०- तर तूं बाहुमंडलाने माझे काय करशील ? बा०- जे सहस्रार्जुनाने केलें तेंच. रा.- मी तुझ्या ह्या भुजवनाला आपल्या प्रतापानीने जाळून __टाकतों. बा०- मी तुझ्या प्रतापाग्नीला पांचशे धनुष्ये धरणान्या हस्त. रूप मेघांनी सोडलेल्या बाणरूप जलधारांनी शांत करतो. १ पतिव्रतास्त्रीचें मन.