पान:प्रसन्न राघव नाटक.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ प्रसन्नराघवनाटक आर्या निजकन्या ही सीता पण तिजला मेदिनी न बोधील ॥ निजबालकी हि करुणा कठिनप्रकृतीस काय निपजेल ॥२५॥ तर आता ह्या अशोक वृक्षाची प्रार्थना करावी. श्लोक अशोकाच्या वृक्षा जनक तनया ही तव सखी दयालो तूं आतां निजरसनिषेकें कर सुखी ।। इला तन्नेत्रांच्या घनसलिलसेकें प्रतिदिनी अळं होतें पूर्ण स्मरसि न तुझे कां निजमनीं ॥ २६ ॥ अरे, हा अशोक वृक्ष तर ऐकतच नाही, तस्मात हा माजो. री आहे असो, बरें सीतेच्या सख्या ही एथे कोणी दिसत नाहीत. ( इतक्यांत त्रिजटा राक्षसी पडद्या बाहेर ये ऊन ह्मणते.) हे जानकी सावध हो. मी०- (सावध होऊन ह्मणते.) वा! माझी सखी त्रिजटा रा. क्षसी एथें आली आहे! त्रि-सीते ह्या तुझ्या मुखचर्येवरून मला असे वाटते, की तु ला काही तरी चांगले स्वम पडले आहे. सी०- हे त्रिजटे मी स्वम असे पाहिले, की कोणी एक मु. वासिनी स्त्री येऊन ती आपल्या एक्या हातांत पांढरें छत्र आणि एक्या हातांत पांढरी चौरी घेऊन रामचंद्राची सेवा करीत होती. त्रि.- तर हे स्वप्न शुभसूचक आहे. सी०- सखे त्रिजटे, तूं ह्मणतेस ते खरे, परंतु माझें मन रा. दिवस रामचंद्राचेंच चिंतन करतें ह्मणून असे स्वमांत पाहिले, तेव्हां माझा ह्या स्वमावर विश्वास कसा पटेल १ १ पृथ्वी. २ तुझी ३ निषेकसिंपडणे