लक्ष्मीनारायण त्रिपाठी
शब्दांकन : वैशाली रोडे
एक आजारी, शांत मुलगा... गप्पगप्प राहणारा...
कसा कुणाच्या लक्षात यावा?
त्याचं लैंगिक शोषण... तरीही तो गप्पच...
कसं कुणाला समजावं?
त्याला जाणवणारं स्वत:मधलं स्त्रीत्व...
ते मात्र समाजाच्या नजरेत आलेलं...
त्यावरून चिडवणंही सुरू झालेलं...
पण त्याला वाटणारं मुलांचं आकर्षण..
कसं कुणाला जाणवावं?
त्याला पडणारे प्रश्न... का असं होतंय? मी कोण?
कसे कुणाला ऐकू यावेत?
त्याची घुसमट... तडफड...
आणि मग त्यानंच शोधलेलं उत्तर...
आधी 'गे' आणि नंतर...
हिजडा !!
‘तो’ लक्ष्मी ते ‘ती’ लक्ष्मी...
पाने : १८८, किंमत : र २००
वर्णद्वेषी गुलामगिरीचा अमानुष प्रवास
अच्युत गोडबोले । अतुल कहाते
'गुलाम' हा शब्द अलीकडे आपण फक्त पत्ते खेळताना वापरतो; पण ! कित्येक शतकं या शब्दानं मानवतेची निव्वळ थट्टा केल्याचा जागतिक इतिहास जाणून घेतला, की या शब्दामधली दाहकता आपल्याला समजेल. पुराणकाळापासून ते आजपर्यंतच्या गुलामगिरीच्या भीषण, दारूण, करुण, अमानवी, जुलमी, महाभयंकर, अत्याचारी इतिहासाची ही सुन्न करणारी सनसनाटी कहाणी आहे. जनावरांपेक्षाही भयानकस्थितीतल्या या गुलामांच्या चळवळींना आणि लढ्याला सलाम करणारी, अमेरिकेच्या वरवरच्या झगझगाटावरचा बुरखा फाडून त्यातले भीषण कंगोरे दाखवणारी आणि म्हणूनच बराक ओबामासारखा कृष्णवर्णीय माणूस या जगातल्या सगळ्यात बलाढ्य देशाचा सर्वात मोठा सर्वोच्च नेता बनल्यावर त्याला सलाम करणारी अशी ही सफर आहे.
पाने : ३७६ किंमत : र ३७०