Jump to content

पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ताई, मी कलेक्टर व्हयनू
राजेश पाटील


निकाल नोटिस बोर्डवर चिपकवल्यानंतर गेट उघडण्यात आले. निकालासाठी ताटकळत बसलेले सर्व नोटिस बोर्डावर मधमाशांसारखे जाऊन चिपकले. सर्वजण बाजूला होईपर्यंत मला धीर धरवेना. शेवटी, उभ्या असलेल्या मुलांच्या कंबरांमधून जागा करून मी मान वर करून तालिकेकडे बघू लागलो. तालिकेत बघितल्यावर माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही. माझ्या हृदयाचे ठोके काही सेकंदांसाठी बंद झाल्याची जाणीव मला झाली. तालिकेत मला फक्त माझे नाव दिसत होते! बाकी मला काही दिसत नव्हते. माझ्या रॅकवरून मला आय.ए.एस. मिळणार निश्चित झाले होते. मी आनंदाची बातमी माझ्या माऊलीला, ताईला कळवण्यासाठी उतावीळ झालो होतो. तिला फोन करेपर्यंत माझा कंठ दाटला होता. ताईने फोन उचलताच मी जोराने ओरडलो, “ताई, मी कलेक्टर व्हयनू."

पाने : १८४, किंमत : र १५०

सप्तसूर माझे
अशोक पत्की


भावगीतं, नाटक, चित्रपट, जाहिराती, जिंगल्स, शीर्षकगीतं असे बहुतेक सगळे संगीतप्रकार हाताळणारे अत्यंत यशस्वी संगीतकार म्हणजे अशोक पत्की.
वादक ते संगीतकार असा जवळपास चाळीस वर्षांतला त्यांचा संगीतक्षेत्रातला प्रवास केवळ अंतस्फूर्तीचा कौल मानून त्यांनी स्वीकारला. कलाक्षेत्रातल्या अस्थिरतेची, अनिश्चिततेची जाण ठेवून अतिशय कष्टपूर्वक केलेली ही वाटचाल म्हणून अनेक वळणांनी, अनुभवांनी समृद्ध झाली आहे. अशोक पत्कींनी भावगीतांमधली हे अभिजात सांस्कृतिकता तर जोपासलीच पण जाहिरातींसारख्या अत्यंत व्यावसायिक, काही अंशी बाजारू कामांनाही आपल्या उपजत मेलडीचा खास रंग चढवून संगीत प्रांतात त्यांना स्थान मिळवून दिलं आहे.

पाने : १७६, किंमत : र १९०