पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ऑफ सिनिअर क्लर्क' असे ताशेरे लाल-हिरव्या शाईने लिहिले जाऊ लागले. तिचा पाणउतारा होऊ लागला. तिच्या सहका-यांना भडकवण्याची आघाडी उघडली गेली.

 पार्वतीनं आपला कामाचा पवित्रा बदलला. शांतपणे आपलं काम नीट करून, इतरांशी जेवढ्यास तेवढाच संबंध ठेवायला सुरुवात केली. पण वाघांनी गुप्तपणे उपसंचालकांकडे अहवाल पाठवून तिची बदली केली.

 एक दिवस ती उपसंचालकांकडे थेट गेली, आपली बदली का झाली याची विचारणा केली. कनवाळू उपसंचालकांनी तिचं सारं ऐकून घेतल्यावर तिचा स्पष्टपणे सारे सांगून टाकले. ते हळहळत म्हणाले,

 “मी कर्नल वाघच्या एकतर्फी अहवालावर विश्वास ठेवून तुझी बदली केली, ही चूकच झाली. पुढील महिन्यात विभागीय पदोन्नतीची बैठक मी बोलावली आहे, त्यावेळी मुख्य लिपिक म्हणून तुझं प्रमोशन होणार हे नक्की! तेव्हा तुला बदली स्वीकारावी लागेल. त्यावेळी मी तुला इथे अकोल्यातच ॲडजस्ट करीन. इथून तुझे गाव काही फार दूर नाही. तेव्हा आता तू इथे जॉईन हो. मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस!

 पार्वतीनं शांतपणे विचार केला, नव-याचे मत विचारले. पदोन्नतीत मंडल अधिकारी म्हणून त्याचीही बदली होणार होती. त्यानेही अकोला येथे रुजू होण्याचा सल्ला दिला. एकतर वर्ष सहा महिन्यात मी बढती होऊन तिथं येईन किंवा पुढील वर्षी इथले तुझ्या ऑफिसचे मुख्य लिपिक सेवानिवृत्त झाल्यावर तुलाच इथं आणता येईल. या अकोला पोस्टिंगनं तुझा इथला ‘लाँग स्टेही' संपून जाईल.'

 तिला धीर आला व ती मुलांना सासूबाईंच्या छत्रछायेत सोडून एकटी अकोल्याला रुजू जाली. महिला वसतिगृहात राहू लागली.

 उपसंचालकांनी आश्वासन दिल्याप्रमाणे दोन महिन्यातच पदोन्नतीची बैठक झाली. मुख्यलिपिकपदी बढतीची शिफारस झाली. मुख्यालयातून मंजुरी मिळताच आदेश निघणार होते.

 पण मुख्यालयातून मंजुरी मिळण्यापूर्वीच त्या उपसंचालकांची तडकाफडकी, राजकीय कारणावरून बदली झाली.

 नव्याने आलेल्या उपसंचालकांपुढे मग तिच्या बदलीची फाईल आली. कर्नल वाघांनी अकोल्याच्या एन.सी.सी.ग्रुप कमांडचे कान भरले. हा ग्रुप कमांडर स्त्रीद्वेष्टा 'क्रॉनिक बॅचलर' निघाला. त्याला कार्यालयात स्त्रीचं दर्शनही नको असायचं. त्यामुळे त्यानेही नव्या उपसंचालकाला रिक्तपदी ‘लिपिक म्हणून

प्रशासननामा । १६७