पान:प्रमाणशास्त्र.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना, ग्रंथाचा अर्थावर लक्ष ठेवून शब्दयोजना व वाक्य. रचना करण्यास प्रयास किती पडले असतील हे सुज्ञांस सांगण्याची जरूर नाही; आणि असे लोक या ग्रंथाचा यथायोग्य आदर करतील या आशेनें भाषान्तरकर्ता हा ग्रंथ त्यांस नजर करीत आहे. या ग्रंथांत जे काही अर्थप्रमादादिक झाले असेल त्याबदल कोणी सुज्ञ गृहस्थांनी भाषान्तरकास सुचविल्यास तो मोठ्या आदराने त्याचा स्वीकार करून ल्याचा यथायोग्य उपयोग करील. या ग्रंथांत जे नवीन शब्द योजिले आहेत, त्यांचा संक्षिप्त कोश लिहिला आहे. त्यांत प्रथमतः इंग्रेजी शब्द लिहून त्यांपुढे योजिलेला शब्द लिहिला आहे. अतःपर याविषयावर ग्रंथ होतील त्यांत मूळ इंग्रेजी शब्दांस या भाषेत दिलेले शब्द एकच आल्याने लोकांस सुलभ पडावे, हा या लहानशा कोशाचा हेतु आहे. KENERAL1201 खेड, (पुणे.