पान:प्रमाणशास्त्र.pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




प्रस्तावना



 आपल्या देशांत हल्लीचा राजकारकीदीत जितके कायदेकानु अवश्य दिसले तितके सरकाराने देशभाषेत प्रसिद्ध केलेच आहेत, व जसजसे अधिकउणे असण्याची जरूर लागत्ये त्याप्रमाणे सरकार करीतच आहेत, परंतु कायद्यावर व्याख्या करण्याचा कामांत सरकाराने आज तागाईत विशेष लक्ष दिलेले दिसत नाही.

 कायदे करण्याची कारणे,हेतु,व ते यथायोग्यलक्ष्यास लागू करण्याची रीति इत्यादि विषयांवर लोककल्याणार्थ व्याख्याग्रंथ इतर लोकांनीच केलेले आहेत, व ते उद्योग अद्यापिही चालू आहेत.

 असे व्याख्याग्रंथ इंग्रेजी भाषेत पुष्कळ आहेत, परंतु या देशभाषेत अद्यापि असा एकही ग्रंथ झालेला नाही, हे पाहून, व अशा ग्रंथाची हल्लीचा लोकस्थितीस आवश्यकता आहे असे समजून, किण्डर्सली साहेब ( म्हणून मद्रास इलाक्यांतील एक जिल्हाजज) याणे पुराव्याचा मूलतत्त्वांविषयी नवीनच इंग्रेजी भाषेत ग्रंथ केला आहे त्याचे हे भाषान्तर लोकसंग्रहार्थ केले आहे. हा व्याख्याग्रंथ फौजदारी आणि दिवाणी या दोन्ही व्यवहारांस सारखाच लागू आहे. या भाषेत हा प्रथमच असा व्याख्याग्रंथ असल्या कारणाने मूळ