पान:प्रमाणशास्त्र.pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


२२
अनुमानें.

अनुमानांचा संशय घेण्याची किंवा जांचा विरुद्ध पुरावा करण्याची कायद्याची परवानगी नाहीं ती; आणि(२), निवार्य अनुमाने; म्हणजे, जी, विरुद्ध पुराव्याने निवारतां येतील, आणि अमुक कनांत असत्य आहेत, असे दाखवितां येतील ती.

 ५०. मुकदम्याचा मुदतीचा कायद्यावरून सदरी उदाहरण दिले आहे ते कायद्याचे निश्चायक अनुमान आहे. इंडियन पीनल कोडचा ८२ व्या कलमांत,सात वर्षांहून कमी वयाचें मूल फौजदारी गुन्हा करण्यास असमर्थ आहे, असे निश्चायक अनुमान केले आहे, हे एक दुसरे उदाहरण आहे.

 ५१. त्याचप्रमाणे शिक्यानिशी खत लिहून दिलें असतां, ते चांगल्या व पुरन्या सबबेनें लिहून दिले आहे, असें इंग्लिश् कायदा निश्चायक अनुमान करतो, आणि पावती, सई व शिक्का करून दिलेली असल्यास, पैका योग्यरीतीने दिला आहे, असे अनुमान गृहीत आहे. परंतु शिक्का करून लिहिलेल्या दस्तऐवजास हिदु व मुसलमानी शास्त्रांत अशी कल्पित योग्यता दिलेली नाही.

 ५२. योग्य अधिकाराचा कोडताने जा विषयाविषयी अखेर निकाल केला असेल, तो निकाल बरोबर आहे, असे कायदा अनुमान करितो; आणि त्याच बाबतीचा दुसऱ्या कजांत न्याच पक्षकाराना पुनः तोच वाद सांगण्याची परवानगी कायदा देत नाही. पुढे व्यावहारिक लेखांविषयींचा व्याख्यानांत