पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। ६ वें ] वंशावळी व माहिती ६५ उच्चांक गांठून पारितोषिके मिळविली. मासिके व वर्तमानपत्रे यांमध्ये लेख लिहितात. यशवंत रामचंद्र (१३) ज. स. १९३६ मार्च ४. मृ. स. १९४६ मार्च २८. नू. म. वि. त मराठी ४ थींत पहिला क्रमांक आला. इंग्रजी १ लींतही पहिला क्रमांक होता. * श्रीकांत रामचंद्र (१३) ज. स. १९४४ सप्टेंबर १५. नारायण सदाशिव (१०) मृ. स. १९१५. वय ८०. शेवटीं काशीक्षेत्रांत मृत्यु यावा म्हणून काशीस गेले. अविवाहित. गोपाळ भास्कर (९) पुण्यास सावकारी करीत. मंडईत खुर्दा विकीत. भार्या (१) पुत्र गोविंद. भार्या (२) पुत्र विठ्ठल. भार्या (३) राधा (यमू), यशवंत रामचंद्र पि. गणेश दिवेकर, पुणे. पुत्र सीताराम, वामन व नारायण. पहिल्या खंडांत वंशावळीमध्ये यांस शिवराम म्हणून एक पुत्र दाखविला आहे. परंतु या नांवाचा यांस पुत्र नव्हता असे नारायण गोपाळ (१०) हे सांगतात. कन्या (१) वालू भ्र. टकले, पिंपळगांव-नाशिक. (२) ठकू, भ्र. कृष्णाजी गंगाधर जोशी, आंबेगांव. गोविंद गोपाळ (१०) पुण्यास सावकारी करीत. भार्या गोदू. कन्या मैना, भ्र गोपाळराव भट, पुणे. वासुदेव गोविद (११) मॅट्रिक. मालेगांव (नाशिक) येथील इंग्रजी शाळेत हेडमास्तर होते. मृ. श. १८५५ आश्विन ब. ३०. भार्या अन्नपूर्णा (यमू), पि. काशीनाथ बापू काळे. कन्या गोदू (भागीरथी), भ्र. रामकृष्ण नागेश अभ्यंकर, सातारा. विठ्ठल गोपाळ (१०) पुण्यास होते. सीताराम गोपाळ (१०) पुण्यास असत. भार्या कृष्णा, पि. दाते, पुणे. गोपाळ सीताराम (११) पुण्यास नगरपालिकेच्या नाक्यावर कारकून होते. वामन गोपाळ (१०) ज. श. सुमारे १८००; मृ. स. १९३१. जी. आय्. पी. रेल्वेत स्टेशनमास्तर होते. भार्या राधा (चिटकू), पि. कृष्णाजी विश्वनाथ छत्रे, व-हाड, कन्या सोनू (सगुणा), भ्र. दत्तात्रेय (यशवंत ) विष्णु कानिटकर, जुन्नर. ५ पं. कु. वृ.