पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ६ वें वशावळी व माहिती १. पहिल्या खंडांत सहाव्या प्रकरणांत वंशावळी व सातव्या प्रकरणांत घराणे व व्यवनी यांची माहिती दिली आहे. या खंडांत वंशावळी व व्यक्तीची माहिती या प्रकरणांत एकत्र दिली आहे. वंशावळीचे स्वतंत्र प्रकरण केले नाहीं. २. वंशावळींत झालेली वाढ किंवा दुरुस्ती दर्शविण्यापुरता अवश्य तेवढा भाग येथे व्यक्तीच्या माहितीजवळ खंडशः दिला आहे. सर्व घराण्याची वंशावळ पुन्हां दिली नाहीं. अनुसंधानासाठीं खंड एकमधील पृष्ठ तेथे दिले आहे. वंशावळ मांडण्याची व माहिती देण्याची पद्धति खंड एकप्रमाणेच ठेवली आहे. वंशावळींतील डावीकडील आंकडे पिढी दाखवितात. । ३. व्यक्तींच्या माहितीत पहिल्या खंडांत आलेली माहिती पुन्हां उद्धृत केली नाहीं. फक्त नवीन माहिती दिली आहे. ४. व्यक्तीचे नांव पहिल्या खंडांत कोणत्या पृष्ठावर आले आहे हे समजण्य साठीं तें पृष्ठ सुरुवातीस दिले आहे. घराणे १ लें, गोळप--पुणे--रामपूर खंड पहिला, पृष्ठ १५१ * गणेश विष्णु (११) औद्योगिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ति देण्या साठी हे आपले मिळकतींतून किमान चाळीस हजार रुपये वाजूस काढून त्यांचा विश्वस्तनिधि करणार आहेत. त्यासंबंधी कायदेशीर योजना करीत आहेत. एवढी मोठी रक्कम धर्मार्थ देणारे पेंडसे कुळांत हे पहिले गृहस्थ आहेत. । * वामन गणेश (१२) मुंबईस दि इंडियन ह्यूम पाईप कंपनीमध्ये नोकरी आहे. वास्तव्य भिवंडीवाल्याची चाळ तिसरा मजला, दादर- मुंबई. कन्या (१) नलिनी, वय १० (२) मंदाकिनी, वय ८. * नारायण गणेश (१२) हे डी. सी. ई. (सिव्हिल) असून पश्चिम खानदेश जिल्ह्यांत नवापूर येथे पब्लिक वर्क्स खात्यांत ओव्हरसिअर आहेत. भार्या सुमति (कुसुम), पि. वासुदेव गोपाळ पटवर्धन, नाशिक. वि. स. १९४५.