पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण असो विशेष आम्ही देशीं होतो तेव्हां दोनचारदां भेट जाहाली होती हाली अनंत भटजी पेंडसे यांनी सांगितले की सुखरूप आहेत.XXआमचे चिरंजीव रघुनाथ भट व अनंतभट आपणापाशी येत असतात हे ऐकून संतोष झाला. आपण श्रीमंतांपाशी आहांत त्यास आमची जाग्याची विपत्य काशीवासाची फार आहे त्याम दरबारातून नाना फडणीस व आणिकांच्या हवेल्या येथे आहेत त्यास लहानमोठे स्थळ आम्हांस नैवेद्य व वैश्वदेव होय ऐसे योजून एखादे लिहून पाठविले पाहिजे. तुम्ही आमचे यजमान व आप्तविषयी स्नेही सर्व तुम्हींच चालविलें आहे दोघे चिरंजीव हल्लीं लिहीणार बरेच जाहाले आहेत त्यास आपले हाताखाली ठेऊन लहानमोठी सोय करून द्यावी. पे. द. जमाव रु. ४८० सु. १२११ बापूजी हरी महाजन । शु. १७३२ गोविंद सदाशिव पेंडसे ( स. १८१० वरील दोघेजण केळशी येथे रहात असल्याचा उल्लेख आहे. संशोधनार्थ क्रमांक २४ खंड पहिला पृ. ३७० मध्ये बा (ळा) जो हरी केळशीस असल्याचे आढळते. तो व बापूजी हरी ही व्यक्ति एक असण्याचा संभव आहे. गोविंद सदाशिव हे घराणे ८ पिढी ३ चे असतील काय ? पे. द. रु. १८० गोविद हरी श. १६८१ व १७३३ कृष्णाजी गोविंद जंजिरे सुवर्णदुर्ग येथील हिशेबांत तालुक्यांतील हक्क वतनदार खटपटी म्हणून गांवोगांवचे लोकांस दिलेल्या रकमा खर्ची पडल्या आहेत. त्यांत कसबा केळशीकरिता शक १६८१ मध्ये गोविंद हरी महाजन यास रु. २५ व शक १७३३ मध्ये कृष्णाजा गोविंद महाजन यास रु. २५ अशा नोंदी आहेत. पेंडसे हे केळशीचे महाजन आहेत. म्हणून हीं नांवें पेंडसे यांचीच हरी श. १६४३ आहेत. उपलब्ध वंशावळींत हीं नांवे आढळत नाहींत. . कृष्णाजी गोविंद हा गोविंद हरीचा पूत्र असावा व गोविद स. १६८१ महाजन या नांवाचा उल्लेख ऐ. क्र. ७२ मध्ये शक १६४३ मधील आहे. म्हणून बाजूस दाखविल्याप्रमाणे कृष्ण श.१७३३ वंशावळ असावी. कालदृष्ट्या यास मेळ बसतो. कृष्णाजी गोविंद यांचा मडव महाजनकीचे वादांत उल्लेख आला आहे तो. हा कृष्णाजी गोविंद महाजन असावा. घराणे १२ पिढी ४ मधील नसावा.