पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख १७ दामोदर महादेव व देवराव* महादेव यांचे नांवे सादर आहे. त्यास हल्ली त्याजकड़न मामलत दूर करून तुम्हांकडे जाहली आहे याकरिता हे आज्ञापत्र सादर केले असे. पेशजीप्रमाणे दोनशे रुपये करार करून देवविले असेत. सरकारचे मक्त्याशिवाय साल दरसाल देत जाणे म्हणोन मोरो शंकर कमाविसदार यास सनद. पे. ६. कोंकण जमाव रु. ४३२ । सु. ११५६ मोहरम १० । श. १६७७ आश्विन शु. १३ गणेश कृष्ण (१३-४) इ. १७५५ ऑक्टोबर १७ । | राजश्री राणोजी वालकवडे गोसावी यास अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नाा वाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद साा सीत खमसेन मया अलफ बाा देणे राजश्री गणेश कृष्ण+ दफ्तरदार बाा स्वारी यास तांदूळ बारीक साडेतीसेरी मापे कैली खंडी २ वा पेशजी ३ जास्ती साल मजकुरापासून ५ एकूण पांच खंडी तांदूळ बारीक देवविले असेत प्रांत राजपुरीपैकीं साल दरसाल पाववीत जाणे. ताजे सनदेचा उजूर न करणे जाणिजे छ १० मोहरम असल सनद रामचंद्रपंत धारप यांजवळ आहे. पे. द. कोंकण जमाव रु. ४३२ ( सु. ११६४ जमादिलाखर १ १ श. १६८५ मार्गशीर्ष शु. ३ कृष्णाजी गणेश (१३-५) । ( इ. १७६३ डिसेंबर ७ राजश्री राणोजी बालकवडे गोसावी यास अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य स्ना माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद सुा। अब सीतैन मया व अलफ. गणेश कृष्ण दफ्तरदार यासी प्रांत राजपुरी पैकीं तांदूळ पांच खंडी पावत होते त्यास ते मृत्यु पावले. सबब त्याचे पुत्र राजश्री कृष्णाजी गणेश दफ्तरदार यासी सदरहुपैकी साल मजकुरापासून तांदूळ बारीक कैली मापी खंडी दोन २ करार करून देवविले असे. प्रांत राजपुरीपैकीं साल दरसाल पाववीत जाणे. दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे जाणीजे छ १ जमादिलाखर. बहूत काय लिहीणे मोर्तब.

  • डिगणे, देवराव = दिवाकर. पेशव्यांचे नाशीकचे तीर्थोपाध्याय व मराठ्यांचे दिल्लीतील वकील.
  • श. १६८८ चे कल्याण सुभ्याचे कागदांत यांस दफ्तरदार म्हटले आहे. तेथे यांचा पुत्र कृष्णाजी गणेश याचाही उल्लेख आहे. ( पे. द. रु. ११२४).

२ प. कु. वृ.