पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे । ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख होती ते पेशजी सरकारांतून दूर केली आहे याजकरतां दोन्ही दरकाचे काम आम्हाकडे सांगितल्यास फडणीसेचे तयनातीवर चाकरी करू म्हणोन. याजवरून पो। मजकूरची पोतनिसी चिमणाजी सदाशिव व दफतरदारी राघो दामोदर याजकडे होती ते दूर करून त्यास मोबदला आसाम्या सांगितल्या आहेत सबब दोनही दरकाची कामें हल्ली बाळाजी लक्ष्मण याजकडे सांगून फडणीसीचे वेतनावर चाकरी करावी याप्रमाणे करार करून हे सनद तुम्हांस सादर केली असे तरी याजपासून परगणे मजकूर येथील दफतरदारी व पोतनिसीचे कामकाज घेत जाणे. म्हणोन मोरो बापूजी याचे नांवे सनद. सुाा सलास मयातेन व अलफ ( स. १८०२ ) मध्ये पोशा जुनी हुबळी प्रांत कर्नाटक नीता जनार्दन रघुनाथ असतांना बाळाजी लक्ष्मण फडणीस यास रु. ३०० तीनशे दिल्याची नोंद आहे. पे. द. जमाव रु. ७२ पे. द. रु. ४९० ( सु. १२१८ सवाल २१ । सखंभट लक्ष्मण (११-५) ५४ श. १७३९ श्रावण व. ८ व (सं. क्र. २७), ( इ. १८१७ सप्टेंबर ४ रा. रा. कारकून नीशा चितो वामन मामलेदार ताा रत्नागिरी गोसावी यांस सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार. सुाा समानअशर मयातेन व अलफ सखो धोंडदेव नेने वो वाडा सडीये मौजे पुसाले कर्यात नेवरे तालुके मजकूर याणी सरसुभा पुण्याच्या मकामीं विदीत केले की सखंभट विन लक्ष्मणभट पेंडसे वास्तव्य मौजे मजकूर यानी आपले ठिकाणावर घर बांधून ठिकाणाची वहिवाट आम्हांस सांगितली त्याचे तोटयाबद्दल दरसाल रु. १० दहा आम्हास द्यावयाचे करार केले त्याप्रमाणे आम्ही दहापांच वर्षे वहिवाट केली. परंतु ठिकाणचे उपद्रवामुळे आमची खराबी बहोत जाहाली. सालगुदस्तां भुताने घरही जाळीले तेव्हां पेंडसे यांस सांगितले की आम्ही जातो. तुमचे ठिकाण तुम्हीं सांभाळावे व गांवचे खोतास सांगून ठिकाण सोडीलें. आणि दुसरें शेत खंडोन राव केला. शेत तयार झालें तो आषाढ मासीं मौजे मजकूरचे खोत यानी आम्हांस तगादा लावला की पेस्तर सालचे दस्ताचे उगवणीचा जामीन देणे. त्यास ज्याचे ठिकाण त्याजपासून उगवणी करून घ्यावी असे सांगितले असतां न ऐकिलां आम्हापासून सीधे खर्च घेऊ लागले येविशीं आज्ञा होऊन ज्याचे ठिकाण त्याजपासुन सरकार दस्ताची उगवणी करून घेऊन आमचे नांवे तगादा लावल्यामुळे दुसरें शेत करावयाचे होते ते राहीलें त्याची नुकसानी व तीत बैलांची खांद पेंडसे याजपासून भरून घेऊन आम्हास देववून आमचे बैल अटकावून ठेवले आहेत ते सोडून द्यावयाची आज्ञा झाली पाहिजे म्हणोन. त्यावरून हे पत्र सादर केले असे तरी मौजे मजकूरचे ठिकाण पेंडसे याचे सखो धोंडदेव नेने याजकडे पेंडसे यानीं वहिवाटीस दिले होते ते त्यानीं मुलूख शिरस्ते प्रमाणे पेंडसे याचे हवाली केले असल्यास त्याजपासून सरकार