पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वंशावळी व माहिती १६७ تھی جی تی ی تی ب - ~~-~- ३ खंड पहिला, पृष्ठ ३१३ * रघुनाथ परशुराम (८) पुण्यास मॅट्रिकचे वर्गात. रा. स्व. संघाचे सदस्य. * वैजनाथ परशुराम (८) पुण्यास मॅट्रिकचे वर्गात. * चितामणि परशुराम (८) पुण्यास इंग्रजी तिसरीत. * भगवान परशुराम (८) ज. श. १८६१ मार्ग. शु. ७. पुण्यास मराठी चवथींत. * विष्णु महादेव (७) लातुर येथे मुद्रणालयांत नोंकरी आहे. भागानगर सत्या ग्रहांत यांनी भाग घेतला होता. * प्रद्युम्न (भालचंद्र) विष्णु (८) शिक्षण इंग्रजी सहा इयत्ता. वायरमनचे काम शिकत आहेत. बार्शी. * XX विष्णु (८) ज. स. १९४७ ऑगस्ट ३. घराणे १८ वें, गिम्हवणे । खंड पहिला, पृष्ठ १३३ । गिम्हवणे येथून विठ्ठल त्र्यंबक (१०) यांजकडून आलेल्या वंशावळींत तिस-या पिढीतील महादेव याचाच वंशविस्तार दाखविला आहे. महादेवाचा भाऊ दामोदर (३), याचा वंशविस्तार नाहीं. त्र्यंबकेश्वर येथे वे. पाटणकर यांजकडे आबाजी जगन्नाथ (६) यांचा व लक्ष्मीबाई भ्र. जगन्नाथ रामाजी (५) यांचा असे दोन लेख आहेत; त्यांवरून दामोदर रामाजीचा वंश आम्ही दाखविला. यांतील पहिल्या लेखांत वास्तव्याचे गांव सातारा व दुस-यांत पलचुरी, संगमेश्वर-सातारा दिले आहे. पुणे येथील वैद्य दप्तरांत उपलब्ध झालेले पत्र पुढे दिले आहे त्यावरून दामोदर राम (५) व नरसो राम (५) हे वैद्य यांच्या आश्रयाखालीं कांहीं उद्योगधंदा करीत असावे असे दिसते. पत्रांतील “ चिरंजीव गंगाधरपंत' हें पांचव्या पिढीतील गंगाधर यास उद्देशून आहे. याच घराण्यांतील धोंडो अनंत (६) यांचाहि वैद्याशी देवघेवीचा संबंध होता. श्री गणराज तीर्थरूप राजश्री रामचंद्रपंत काका वडीलांचे सेवेसीं. अपत्ये दामोदर राम व नरसो राम पेंडसे सीर सा. नमस्कार विज्ञापना तारा ३ व ५ पर्यंत ४ ४ असे विशेष चिरंजीव गंगाधरपंताचे स्त्रीचे वर्तमान पेशजी कळलेच आहे. त्यास लग्न करावे हा अर्थ X X त्यास नवरीची योजणक करावी. सारेजण घरी आहों तो करून घ्यावे मागतीं धंदीयासी गेले पाहिजे याजकरीतां हें लग्न आपणास करावे लागेल X X हे विज्ञापना वरील पत्र ज्यास लिहिले आहे ते रामचंद्रपंत काका म्हणजे रामचंद्र गोपाळ करकरे असावे. हे वैद्य यांजकडे दिवाणजी होते. यांचा काळ सन १७५९ ते १७८० पर्यंत असावा; म्हणजे हे पत्र याच कालांतील असावे.