पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ पेंडसे—कुल-वृत्तान्त [ प्रकरण

  • नारायण विनायक (७) रेवा संस्थानांतील (विध्य प्रदेश) बुन्हार (पोस्ट धनपुरी)

येथील कोळशाचे खाणींत असिस्टंट मॅनेजर आहेत. मासिक प्राप्ति रु. ७५०. हिंदुत्वाचे अभिमानी असून अनाथ हिंदुमहिलाश्रम, पुणे; अनाथ हिंदुआश्रम, राष्ट्रीय निधि, भागानगर निःशस्त्र प्रतिकार, आर्यधर्म सेवासंघ, अ. वि. गृ. पुणे या प्रत्येक संस्थेस शंभर रुपये दिले आहेत. अशाच त-हेचे काम करणा-या इतर संस्थांसहि द्रव्यसहाय्य करितात. वार्षिक उत्पन्नाचा ठराविक अंश परोपकारार्थ खर्च करण्याचा यांचा नियम आहे. * जगदीश नारायण (८) पुण्यास इंग्रजी सहावीत. रांगोळीचा गालिचा काढणे, चित्रे तयार करणे इत्यादि हस्तकौशल्याची कामे चांगली करतो. * सुरेश नारायण (८) पुण्यास इंग्रजी तिसरींत. ।। ।। १ विजयकुमार नारायण । २ जयश्री विठ्ठांस, स. १९४८ * विजयकुमार नारायण (८) ज. श. १८६८ माघ व. ८. | खंड पहिला, पृष्ठ २४० * पांडुरंग शिवराम (७) बृहन्महाराष्ट्र शुगर सिडिकेटचे कारखान्यांत श्रीपूर येथे फिटर आहेत. मोल्डिगहि करतात. भार्या सुशीला (काशी), पि. गोपाळ गणेश मेहेंदळे (किडमिडे), मु. वि. श. १८६१. कन्या मनकणिका, ज. श. १८६७ श्रावण व. ६. * नरिसह पांडुरंग (८) ज. श. १८६४ श्रावण व. ११. प्राथमिक विद्यार्थी. गणेश बाळाजी (६) मृ. श. १८६५ आश्विन व. ३०. | खंड पहिला, पृष्ठ २४१ * गोविद गणेश (७) कन्या (१) अंबू, मृ. श. १८६८ आश्विन शु. ८. (२) काशी, ज. श. १८५१ अधिक वैशाख. शालान्त परीक्षा व संस्कृत व हिंदी प्रथम परीक्षा उत्तीर्ण. इंग्रजी पांचवी. (३) सुंदर, ज. श. १८५७ कातिक. शालान्त। परीक्षा उत्तीर्ण.