पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३.१४ पेंडसे—कुलवृत्तान्त [प्रकरण ०००००००००००० • याचे पंच व कार्यवाह. औद्योगिक निधि ऊर्फ पैसा फंड याचे सः १९४२ पासून मुख्य कमिटीचे सभासद आहेत. अनाथ विद्यार्थी गृह, पुणे याचे स. १९३९ पासून सन्मान्य आयव्यय निरीक्षक आहेत. चित्तपावन वधूवर माहिती संघाचे सुरुवातीपासून हिशेब तपासनीस असून भिडे औद्योगिक संशोधन ट्रस्टचे १९३८ ते १९४४ पर्यंतचे हिशेब तपासून दिले. अखिल भारतीय चित्तपावन ब्राह्मण परिषद पुण्यास स. १९४० मध्ये भरली. तिचे एक कार्यवाह होते. अ. वि. गृह, पुणे व रसायननिधि, पुणे या संस्थांस प्रत्येकी एक सहस्र रुपये दिले. ब्राह्मण कार्यालय, पुणे; अनाथ हिंदु महिलाश्रम, पुणे ; महाराष्ट्र टेक्निकल ए. सोसायटी, शिक्षण प्र. मंडळी इत्यादि संस्थांस प्रत्येक शंभर रुपये दिले असून इतर अनेक संस्थांस व नैमित्तिक सार्वजनिक कार्यास सहाय्य देत असतात. राहणी साधी. अवंतिका लवाटे, नोव्हें. १९४८. या कुलवृत्तान्ताचे संपादक, कुलवृत्तान्त संघाचे संस्थापक व कार्यवाह. खरे व काळे कुलवृत्तान्त यांच्या प्रोत्साहनाने यांच्या स्नेह्यांनी यांचे मदतीने तयार केले. सध्यां लेले कुलवृत्तान्ताचे काम यांचे देखरेखीखाली चालू आहे. भार्या (१) रुक्मिणी, मृ. श. १८३४ भाद्रपद व. २. कन्या पद्मावती (पद्मा) मॅट्रिक. भ. मोरेश्वर गणेश लवाटे, बी.ए. पुणे. वि. श. १८६४. यांना तीन अपत्ये-अशोक, आनंद व अवंतिका आहेत. खंड पहिला, पष्ठ २३९

  • हृषीकेश कृष्ण (८) बी. एस्सी. (स.१९४६). पुण्यास रानडे इंडस्ट्रिअल अॅन्ड एकॉनामिकल इन्स्टिट्यूटमध्ये एम. एस्सी. च्या पदवीसाठी प्रबंध लिहीत आहेत. भोसले मिलिटरी स्कूल नाशिकचा उन्हाळ्यांतील अडीच महिन्यांचा शिक्षणक्रम-घोड्यावर बसणे, बंदुक मारणे इत्यादि-स. १९४२ मध्ये पुरा केला. कॉलेजांत असतांना युनिव्हसिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोअरमध्ये दोन वर्षे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य ।

५ । ।