पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती १०७: खंड पहिला, पृष्ठ २२१ * शरत्कुमार गजानन (८) स. १९३८ ते १९४३ पर्यंत मेट्रॉपॉलिटन व्हिकर्स यांच्याकडे काम केले. नंतर महायुद्धांत रॉयल् इलेक्ट्रिकल् अॅन्ड् मेक्यानिकल इंजिनिअर्समध्ये दाखल झाले. डिसेंबर १९४४ मध्ये हिंदुस्थानांत आले व इन्डियन इलेक्ट्रिकल अॅन्ड मेकॅनिकल इंजिनीअर्समध्ये बदली झाली. सध्या ले. कर्नल • हा हुद्दा आहे. वास्तव्य कलकत्ता. भार्या डी. आय्. शार्प. वि. स. १९४३. * कमलाकांत गजानन (८) एल्. आर्. सी. पी. एम्. आर्. सी. एस्. (१९४२) एम्. बी. बी. एस्. (लंडन) ग्रेब्रिट्नमध्ये मेडिकल् प्रैक्टिशनर् आहेत. वास्तव्य * Struan" Llanbradach near Caerphilly, Glam Organshire, U. K. विलायतेत स्थायिक झालेले हे पहिले पेंडसे होत. • भार्या लीला, पि. मंडल. वि. स. १९४२. * पद्मनाभ गजानन (८) अर्थशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन स. १९४० त बी.ए. (ऑनर्स) (मुंबई) व स. १९४३ त' अर्थशास्त्र घेऊन एम्. ए. (अलाहाबाद) झाले. १९४४ ते १९४७ पर्यंत युनाइटेड कर्माशिअल् बँक कलकत्ता, असोशिएटेड प्रेस ऑफ अमेरिका, युनायटेड प्रेस् ऑफ इन्डिया व असोशिएटेड प्रेस ऑफ इन्डिया अॅन्ड रूटर्स मुंबई यांत नोकरी केली. ऑक्टोबर १९४७ त उच्च शिक्षण व वृत्तव्यवसायाच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले. सध्या लंडन युनिव्हर्सिटींत रशियन भाषेची पदवी मिळविण्यासाठी अभ्यास चालू आहे. * सहदेव गजानन (८) पुण्यांत कॉलेजांत इन्टर सायन्सचे वर्गात. नारायण गणेश (७) कन्या (१) लीला (मनोरमा), भ्र. शंकर मुकुंद लेले, अनगांव. वि. श. १८५३. (२) इंदुमती. मृ. सं. १९४२. (३) द्रौपदी, मृ. स. १९४७. भ्र. मोरेश्वर गोपाळ जाईल, मुंबई. खंड पहिला, पृष्ठ २२२, * श्रीपाद नारायण (८) बी. एस्सी. मुंबईस ऍम कंपनीत कारकून आहेत. यांनी खडकावरील हिरवळ इत्यादि पुस्तके लिहिली आहेत. वास्तव्य ११ गोखलेवाडी, भवानी शंकर रस्ता, दादर, मुंबई १४. भार्या कमला, पि. नारायण मोरेश्वर मराठे, सांगली. कन्या सुनंदा.. * निजानंद नारायण (८) मुंबईस जी. आय्. पी. रेल्वेत कारकून आहेत. * अनंत नारायण (८) मुंबईस इंग्रजी शिकतात. कृष्णाजी गोविंद (४) हे मुर्डी-आंजल्र्याहून केळशीस जाऊन राहिले होते असे प्रथम खंडांत म्हटले होते; परंतु हे ते कृष्णाजी गोविंद नसून याच नांवाचे गृहस्थ त्या वेळी केळशीस होते असे दिसते. ..