पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १०५

  • चितामणि कृष्ण (८) मुंबईस बंधूबरोबर कारखान्यांत काम करितात. विष्णु गणेश (७) मृ. स. १९४२ जानेवारी २५.

| खंड पहिला, पृष्ठ २१८ । गजानन गणेश (७) जून १९४० मध्ये सेवानिवृत्त झाले व पुण्यास राहू लागले. थोडेच दिवसांत म्हणजे ३० जानेवारी १९४१ रोजी अर्धागाने मृत्यु पावले. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या फुरसतींत त्यांच्या ज्ञानाचा समाजास उपयोग झाला असता; तो त्यांच्या निधनामुळे होऊ शकला नाही. भार्या सरस्वतीबाई ऊर्फ ताई या पुणे हिंदु महिला सभेच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत हिंदु महिला सभेचे काम झपाट्याने वाढून गत वर्षी क-हाड येथे महाराष्ट्र प्रांतिक हिंदु-महिला-परिषद उत्तम रीतीने पार पडली. मनमिळाऊ स्वभाव, सामाजिक कार्याची आवड, वक्तृत्व, शांत वृत्ति इत्यादि - गुणांमुळे यांच्याबरोबर काम करणा-यांस यांचेबद्दल आदर वाटतो. पुणे हिंदुमहिलासभेच्या या आधारस्तंभ आहेत. कन्या (१) कुसुम (मंगला) बी. ए. बी. टी., भ्र. डॉ. गोपाळ केशव करंदीकर, पुणे. वि. स. १९४३. (२) • शकुंतला, पुण्यास बी. ए. च्या वर्गात आहे.

  • खंड पहिला, पृष्ठ २२०

• चंद्रकांत ऊर्फ बापूराव गजानन (८) फेब्रुवारी १९३९ मध्ये मिटिऑरॉलॉजिकल खात्यांत नेमणूक झाली. सध्या पुण्यांत मिटिऑरॉलॉजिस्ट (फर्स्ट क्लास ऑफिसर) आहेत. • शास्त्रीय नियतकालिकांत यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. वास्तव्य ३२५ क सदाशिव पेठ, भिडे वाडा, पुणे. भार्या शांता, ज. स. १९१६ डिसें. बी. ए., बी. टी. पि. नारायण जनार्दन काळे (वत्स), बेळगांव. वि. स. १९४१, कन्या (१) शोला, ज. स. १९४२ मे. (२) नीला, ज. स. १९४३ ऑक्टो. * अजित चंद्रकांत (९) ज. स. १९४६ ऑगस्ट. अजित चंद्रकांत, नोव्हेंबर १९४८