पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

wwwwwwwww••••• ८२ पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण महादाजी राम (४) यांची कारकून शिलेदाराची रुपये १५० दीडशेची आसामी हे मृत्यु पावल्यामुळे यांचा पुत्र रामचंद्र महादेव यास शक १७१३ पौष शु. १३ चे सनदेने करून दिली. (ऐ. क्र. ४७ पहा.) हे व यांचे बंधु पांडुरंग रामचंद्र यांस शिलेदार म्हणून पुण्यास श्री. सवाईमाधवराव यांचे लग्नाचे वेळी दुमाही आणले होते. तनखा अनुक्रमे रु. ५० व ४० प्रमाणे होता. रामचंद्र महादेव (५) यांजकडे वडिलाजित शिलेदाराची आसामी चालू होती. पारसनीस संग्रहांतील कागदांत रामचंद्र महादेव पेंडसे यांनी पुरुषोत्तम लक्ष्मण पेंडसे यांस शक १७३४ मध्ये लिहिलेली पत्रे आहेत, ते रामचंद्र महादेव हेच असावे. पांडुरंग रामचंद्र (४) यांना प्रांत राजपुरीकडे भात खंडी ३ तीनची नेमणूक होती. यांचे घर अवचितगड तालुक्यांत म्हणून ती तिकडे बदलून दिली. शक १७०६ पौष शु. ३. (ऐ. क्र. ४८ पहा). पे. द. घडणी रुमाल ३०८ मध्ये यांचा दोनदा कारकून शिलेदार म्हणून शक १७२० चे सुमारास उल्लेख आढळतो. रामचंद्र पांडुरंग (५) छ २ सफरला (वर्ष माहीत नाहीं) यांचे वडील वारल्यामुळे त्यांस मिळणारे भात खंडी ३ तीन यांस देत जावे असा उल्लेख पेशव | दप्तरांतील कागदांत आहे; तेथे यांस कारकन शिलेदार म्हटले आहे. । रामचंद्र त्र्यंबक (८) यांचे पुण्यास बेलबागेजवळ गंध्याचे दुकान होते. * विनायक महादेव (९) बंगलोर येथे मिलिटरी फार्ममध्ये नोकरी आहे. पुण्यास गृह क्र. २६५ नारायण पेठ, येथे बि-हाड आहे. भार्या (१) सरला, मृ स. १९४२ मार्च ३. पुत्र विलास. भार्या (२) सरोजिनी, पि. नारायण विष्णु भागवत. पुत्र विजय. कन्या विनोदिनी ज. स. १९४७ सप्टेंबर ५. * विलास विनायक (१०) वय ७: * विजय विनायक (१०) वय २. | खंड पहिला, पृष्ठ १८३ गोपाळ नारायण (७)कन्या (१)गंगा (जानकी), भ्र. गंगाधर गणेश फणशे, पळस्प (२) यमुना (ती), ४. सदाशिव बल्लाळ जोशी, पोमेंडी. * हरी गोपाळ (८) वाव्य ठाणेकर बिल्डिग, आग्रारोड, कल्याण. भार्या अन्नपूर्ण पि. महादेवराव घाणेकर, पुणे. * अनंत हरी (९) मुंबईस मेट कॉम्युनिकेशन सेंटरमध्ये टी. पी. ऑपरेटर आहेत वास्तव्य-ठाणेकर बिल्डिग खोलो नं. ४ आग्रारोड, कल्याण. भार्या उषा (कमल) , वय २३, पिः श्रीपाद खंडेराव वैद्य, करंजगांव. कन्या नलिनी, वय ३. * श्रीनिवास अनंत (१०) वय ५. * दत्तात्रेय गोपाळ (८) पुण्यास बिस्किट कारखानदार साठे बंधू यांचेकडे नोकरी आहे. कन्या (१) द्वारका (सुशीला), भ्र. गोविंद वासुदेव सहस्रबुद्धे, कोतवडे (२) सुमन (मंगला), भ्र. महादेव भास्कर कोपरकर, पेढबे.