पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८3 पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण ۔ تی ہے ۔ میری سی عمران علی سے ۔ میں نے سی

  • पुरुषोत्तम त्र्यंबक (१०) कुल्र्यास स्वदेशी मिलमध्ये नोकरी आहे. वास्तव्य

सर्वेश्वर मंदिर, कुर्ला. भार्या प्रमिला (यमू), पि. केळकर, चौल, कन्या कमल ज. श. १८६७. खंड पहिला, पृष्ठ १८१ नारायण केशव (९) भार्या रमा (मथुरा), पि. नारायणराव जोशी, विसनगर. * निबराज (राजाराम) नारायण (१०) यांचे नांव निबराज आहे. ह्यूम पाईप कंपनीत नोकरी होती. महादेव चितामणि (८) बडोदे येथे मुन्सफ होते. भार्या उमा, मराठ्यांकडील. घराणे ४ थे, गोळप-अक्षी-नागांव | खंड पहिला, पृष्ठ ८३ । क्षेत्रोपाध्यायांकडील पुढे दिलेल्या लेखांवरून व इतर माहितीवरून या घराण्याच्या पूर्वी दिलेल्या वंशावळींत बरीच सुधारणा करावी लागत आहे. गणेश नारायण (४) यांस रामचंद्र या नांवाचा पुत्र, तसेच विठ्ठल नारायण (४) यांस बाळाजी या नांवाचा पुत्र नव्हता. रामचंद्र व बाळाजी हे घराणे २६ मधील आहेत. घराणे २६ मध्ये यासंबंधी तपशीलवार माहिती दिली आहे. रामचंद्र पांडुरंग (५) यांस बाळकृष्ण या नांवाचा दुसरा पुत्र होता. तो व त्याचा वंश वंशावळींत नव्याने दाखविला आहे. संशोधन क्र. ३ यांत सूचित केले होते त्याप्रमाणे त्यांतील व्यवतींचा समावेश या घराण्यांत झाला म्हणून तो क्रमांक रद्द समजावा; तसेच संशोधन क्र. ३८ यांतील गणेश बाळकृष्ण हे याच घराण्यांतील पिढी ७ मधील आहेत; म्हणून तोहि क्रमांक रद्द समजावा. संशोधन क्रमांक ३ जानकी भन्न. चिमणभट व गंगवाई भ्र. मोरोपंत सा. विठ्ठल चु. दी. सखोपंत, अक्षी-नागांव | रखमा भ्र. विठ्ठलभट सखोपंत अ. सा. सदाशिव, दी. आनंदराव व तात्या, अक्षी-नागांव. वेरूळ-पैठण-गंगा भ्र. मोरोपंत, सा. विठ्ठलपंत, चु. दी. सखोपंत, दी. चिमणभट, अक्षी-नागांव. वेरूळ-पैठण-सखाराम बापूजी आ. नारायण रघुनाथ, बं. चिमणभट, पुत्र विठ्ठलपंत अक्षी-नागांव. दाते-जानकी भ्र. चिमणाजी विठ्ठल चु. दी. सखोपंत पुत्र अनंत. चु. सा. वापूजी, सासू राधा. दाते-विठ्ठल नारो राघो नारो बंधु गणेश व वापू चु. रामाजीपंताचा पांडुरंग. गोडबोले, काशी-महादेव बाळकृष्ण, चुलते नारो रामचंद्र, बंधु गणेश. ज्येष्ठ वद्य १३ शक १७८४. मूळ वस्ती अक्षी; हल्ली पुणे व वडोदे.