Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३
इतिहास संशोधन व इतिहास मंडळ

अभ्यंग स्नाने घालीत आहेत; त्यांचे रोगग्रस्त भाग प्रसंगी कळकळीच्या मवाळीनें सुसह्य होणाऱ्या शत्रकारांनी कापून काढून निराळे करीत आहेत; कित्येक ठिकाणीं मलमें लावीत आहेत; तर कित्येक ठिकाणी नवे अवयवही कृत्रिम तऱ्हेने बनवून चिकटवीत आहे व जुन्यांस रजा देत आहेत. ह्या सर्व गोष्टी केवळ कवि-कल्पना वाटण्याचा पुष्कळ संभव आहे, परंतु ज्यांनी हे पत्रांचे गठ्ठे स्वतां पाहिले आहेत, त्यांस तसें वाटण्याचे कारण नाहीं. तीन- चार पुस्तकें वाळवीनें इतकी खाल्ली आहेत कीं, त्या वाळवीच्या किड्यांच्या मृत शरीराची माती त्या पुस्तकांत भिनून एकंदर पुस्तकाची माती- कां? दगडी पाटीच बनली आहे. अशा स्थितीत असलेलीं हीं पुस्तकें फिरून बोलकी करावयास प्रथम त्यांस युक्तीनें वाफारा द्यावा लागतो. हा वाफारा देतांच त्या प्रस्ताराचे पापुद्रे कांहींसे सुटे होतात. ते तसे सुटे झाल्यावर लगेच गर्भाशयांतील शस्त्रक्रियेच्या प्रसंगीं जितक्या हलक्या हातानें आणि काळजीपूर्वक काम करावें लागतें, त्यापेक्षांही अधिक हलक्या हाताने आणि कळकळीनें त्या प्रस्तरप्राय पुस्तकाचें एक एक पृष्ठ सोडवावें लागतें. अशीं ही सोडविलेलीं पृष्ठे फिरून चिकटू नयेत म्हणून त्यांच्यामध्ये एक एक टिप कागदाचे किंवा साध्याही कागदाचें पृष्ठ घालून ठेवावें लागतें. इतकें करूनही हीं पृष्ठे आपले सर्व हृद्गत बोलून दाखविण्यास समर्थ होत नाहींत. इतकेंच नव्हे, तर कित्येक अगदी निरक्षर म्हणजे मुकीं झालेलीच जेव्हां आढळतात, तेव्हां मनाला किती उदासवाणे वाटत असेल, याची कल्पनाच करणें बरें" याच प्रस्तावनेत द्रव्यसाहाय्य करण्याबद्दल सर्व जनतेस मोठी