कॉलेज स्थापिल्यास, येथून धाडसी व सुशिक्षित नावाडी व कुशाग्र विद्वान् निपजण्याचा संभव आहे." अशाप्रकारें जेथें जातील तेथे सूक्ष्म बुद्धीनें सर्व पहात. पत्रें वगैरे मिळविण्यास त्यांस कशी मारामार पडे. याचे त्यांनीच आपल्या एका खंडाच्या प्रस्तावनेत वर्णन केले आहे. कनक व कांता यांस जिंकून, मानापमानाचें गांठोडें बांधून ठेवून, आशेस फार सैल न सोडतां, सतराशें खेटे घालावयास लागले तरी तयार असणें वगैरे गोष्टी संशोधकास पाहिजेत. एखादे वेळी उन्हातान्हातून जावें व पत्रे दाखवू नये. असेही होईल असे ते सांगत. कारण स्वतः त्यांस कऱ्हाड मुक्कामी असतां असे कटु अनुभव आले होते. दप्तरें झाडून साफ करावयाची, धुळीनें नाकपुड्या भरून जावयाच्या; कोळिष्टकांनी डोकें भरून जावयाचें; या सर्व धुळवडीस तयार असले पाहिजे, तर पत्रलाभ होईल असे ते म्हणत. पुन्हा कधीं कधीं पत्रें मिळत त्यांचे गठ्ठे वाळूनें खाल्लेले अगर पावसाने एकत्र झालेले असे असावयाचे. सातव्या खंडाचे संपादक आपल्या प्रस्तावनेत लिहितात. "हीं इतिहासाची साधनें अश्रांत परिश्रमानें कधीं उकिरड्यांतून तर कधीं उकिरडे वजा झालेल्या जुन्या वाड्यातील तळघरांतून अथवा कधीही वापरांत नसलेल्या तिसऱ्या, चवथ्या मजल्याच्या माळ्यावरून- उन्हाळ्यांतील कडक ऊन, पावसाळ्यांतील पाऊस व हिंवाळ्यांतील थंडीचे कडके खाऊन, कडकून, भिजून आणि फिरून आकर्षून- केर कचरा व वाळवी यांच्या अखंड मैत्रीत 'कालोह्यहं निरवधिर्विपुलाच पृथ्वी" या भवभूतीच्या उक्तीवर विश्वास टाकून बसलेलीं अशीं रा. रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे बी. ए. यांसारखे पदवीधर उजेडांत आगीत आहेत; त्यांना
पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/४८
Appearance