यथेच्छ राहिले. नंतर एक महिनाभर परीक्षेचा अभ्यास नीट कसोशीनें करण्याकरितां ते पुण्यापासून बारा कोसांवर वडगांव म्हणून एक खेडें आहे तेथें जाऊन राहिले. १८९० च्या जानेवारी महिन्यांत ते बी. ए. ची परीक्षा पास झाले. राजवाडे लिहितात "मॅटिकपासून बी. ए. पर्यंत मी कधीं नापास झालों नाहीं; १८८४ साली प्रथम मी डेक्कन कॉलेजांत गेलों, त्यावेळीं दर दोन दोन महिन्यांनी एक एक परीक्षा जर घेतली असती, तर ह्या तिन्ही परीक्षा पहिल्या सहामाहीतच मी पास झालो असतो. परंतु सहा टर्मा, सहामाही व उपान्त्य परीक्षा व मुंबईच्या फेन्या, अशा नानाप्रकारच्या खुळांत सांपडल्यामुळे १८८४ पासून १८९० पर्यंत मला व्यर्थ रखडत रहावें लागलें. ह्या रखडण्यांत इतकें मात्र झाले की, माझ्या मनाला जें योग्य वाटलें तेंच मी केले; आणि कॉलेजांतील खूळसर शिस्तीला बळी न पडतां मन व मेंदू यांना शैथिल्य व शीण येऊ न देतां, जगांत जास्त उत्साहाने काम करण्यास मी सिद्ध झाले."
१८९० मध्ये परीक्षा बी. ए. ची झाली. मनानें व शरीरानें कर्तबगारी करावयास तयार झालेला हा वीर आतां हळूहळू आपल्या उद्दिष्ट ध्येयाकडे कसा गेला हें आतां पाहूं.
पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/३५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९
जन्म, बालपण व शिक्षण.