Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विषय प्रवेश.

जन्मती' असेंच राजवाडे यांच्या बाबतीत मला म्हटले पाहिजे. त्यांच्या निकट सान्निध्यांत ज्यांनीं वर्षे घालविली असतील, त्यांच्या प्रतिभेची प्रभा ज्यास सतत पहावयास मिळाली असेल व त्यामुळे ज्यांच्या हृदयांतील भ्रांतितिमिराचा निरास झाला असेल, राजवाड्यांच्या सर्वगामी बुद्धीचें वैभव ज्यांस आकलन करितां येईल, त्यांचा गूढ स्वभाव ज्यांस उकलतां आला असेल, अशा पुरुषांनी त्यांची चरित्रे लिहिली तर तीं पूज्य व आदरणीय होतील. ती तशी लिहिली जातीलही; परंतु भक्तीला कमी जास्त समजत नसतें, म्हणून माझी भक्ति मला सांगे 'जा, तूंही आपली वाक्सुमनांजलि त्या थोर पुरुषाच्या पदारावंदी अर्पण कर.' भक्तीचा एकच घांस विश्वमोलाचा असतो; तो परमेश्वरास प्रिय होतो; तद्वत् माझ्या या भक्तीनें कै. राजवाडे यांस संतोष होवो; त्यांस संतोष होईल की नाही हें मला कळावयास मार्ग नाहीं; परंतु आपले कर्तव्य केल्यानें मला मात्र संतोष होत आहे खरा.



प्रकरण १ लें.
जन्म, बाळपण व शिक्षण.

 कै. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा जन्म शके १७८५