Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. अर्थोऽयं ब्रह्मसूत्राणां भारतार्थविनिर्णयः । गायत्रीभाप्यरूपोऽसौ वेदार्थपरिबृंहितः ॥ ८३ श्रीमद्भागवत आम्हां सनातनधर्मीयांस अत्यंत प्रिय वाटतें; कारण:- ( १ ) याच्या श्रवणमात्रानें हरि चित्तांत सांठवतो; ( २ सर्वांत हैं श्रेष्ठ आहे; कारण, यांत प्रतिपदर्दी ऋषींनी हरीची स्तुति केली आहे; ( ३) हें ब्रह्मसूत्रांचा अर्थ; भारताच्या अर्थाचा खासा निर्णय व गायत्रीचें भाष्यरूप आहे. ( ४ ) वेदार्थाचें परिबृंहण ( विस्तार ) करणारे आहे. वरील कारणांमुळे भागवतावर जनांची परम श्रद्धा असतां, कांहीं पूर्वीच्या मतवाद्यांनी व कांहीं अर्वाचीन पाश्चात्त्य लेखकांनी व एतद्देशीय आर्यसमाजिस्टांनी त्यावरची श्रद्धा उडविण्याचे यत्न केलेले आहेत. ते असे:- ( १ ) पूर्वीच्या मतवाद्यांचें मत असें कीं, वैष्णव भागवत हैं महा- पुराण नसून, फक्त एक वैष्णवतंत्र आहे; देवीभागवतच महापुराण होय ! ( २ ) अर्वाचीन लेखकांचा आक्षेप असा आहे की, भागवत व्यास- कृत नसून बोपदेवानें रचिलें ! या दुसऱ्या मताबद्दल प्रथमच वर विचार केलेला आहे. आतां पूर्वीच्या मतवाद्यांच्या मताचा विचार करूं. श्रीधरस्वामींच्या टीकेंत एके ढाई ' अतो भागवतं नामाऽन्यदिति नाशंकनीयम् । ' असें म्हटलेले आहे. यावर कै० गोपाळाचार्य म्हणतात की, कालिकापुराण, सौरपुराण, देवीपुराण, देवीभागवतपुराण, विष्णु- भागवतपुराण - या सर्व भागवत नांवाच्या पुराणांमध्यें महापुराण विष्णु- भागवतच होय, कालिकादिपुराणे नव्हत, असे सांगण्याचा श्रीधर स्वामींचा भावार्थ आहे ! श्रीधरस्वामींच्या वेळीं 'भागवत' या नांवाखाली २-४ पुराणें तरी नांदत होती असे स्पष्ट दिसतें; व त्यांपैकी कांहीं आप- णांस महापुराणही म्हणवून घेत होर्ती ! निदान देवीभागवत तरी आप