पुराणनिरीक्षण. हा उल्लेख बराच प्राचीन आहे. जै. अ. पर्वाचें अगर्दी अर्वाचीन स्वरूप धरिलें तरी तें इ. पू. १०० इतकें तरी जुनें धरावेंच लागतें. ८२ ( ३ ) तसेंच यादवांचे गुरु गर्गाचार्य यांनी केलेल्या गर्गसंहितेंतही भागवताचा व १८ पुराणांचा खूप महिमा गाइला आहे. ( ४ ) चाणक्याच्या नीतींत (इ.पू. ३५०) एक श्लोक असा आढळतो:- प्रातर्यूतप्रसंगेन मध्यान्हे स्त्रीप्रसंगतः । रात्रौ चोरप्रसंगेन कालो गच्छति धीमताम् ॥ यांत भारत, रामायण व भागवत यांचा अनुक्रमें उल्लेख आहे असें सज्जन मानतात. सारांश, गर्ग—जैमिनि–शौनक - चाणक्य - या इ. पू. च्या व्यक्तींस व हनुमत्, चित्सुख, गौडपादाचार्य, शंकराचार्य, श्रीधरस्वामी, हेमाद्रि, बोप- देव या इ. स. नंतरच्या व्यक्तीस भागवत माहीत होतें. बोपदेवाचे व श्रीधरस्वामीचे वेळीं तर ( इ. स. ११०० ) भागवत थेट आतांप्रमाणेंच होतें. त्याला सद्यःस्वरूप केव्हां मिळाले असेल हैं दुसरीकडे आपण पाहि लेलें आहे. कोलब्रूक, विल्सन व आर्यसमाजिस्ट समजतात त्याप्रमाणें हा ग्रंथ बोपदेवकृत नाहीं; त्याहून कित्येक शतकें प्राचीनतर आहे. भागवताचें महत्त्व. भागवताचें महत्त्व पद्मपुराणाच्या शब्दांनींच सांगणें इष्ट वाटतें:- सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा | यस्याः श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत् । पुराणेषु च सर्वेषु श्रीमद्भागवतं परम् || यत्र प्रतिपदं विष्णुगयते बहुधर्षिभिः ॥ -
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/९७
Appearance