Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. श्रीधरी ( ११०० ) यांशिवाय दुसऱ्या कोणत्या प्राचीन टीका भागव तावर होत्या हैं कळत नाहीं. आज सर्वोत प्राचीन अशी उपलब्ध टीका म्हटली म्हणजे श्रीधरस्वामींचीच होय ! ८० कै० गोपाळाचार्य कऱ्हाडकर हे आपल्या भागवतभूषण नामक ग्रंथांत खालील माहिती देतात:- - ( १ ) पद्मपुराणांतील वासुदेवसहस्रनामावर श्रीशंकराचार्योचें भाष्य आहे; त्यांत पहिल्या शतकांतील पांचव्या नांवावर टीका करिते वेळीं खालील भागवताचा उतारा त्यांनी घेतलेला आहे:- .“ “ स आश्रयः परं ब्रह्म परमात्मा परात्परः ' इति भागवते । " — पहिल्या शतकांतील ५५व्या नांवावर लिहिते वेळीं असे म्हटले आहे:- ““ पश्यंत्यदो रूपमदम्रचक्षुषा | सहस्रपादोरुभुजाननाद्भुतम् ' इत्यादि भागवते । (२) शंकराचार्यांनी केलेल्या चतुर्दशमतविवेकांत असें म्हटलेलें आहे. ' परमहंसधर्मो भागवते पुराणे कृष्णेनोद्धवायोपदिष्टः । , ( ३ ) श्रीशंकराचार्यांचे परमगुरु गौडपादाचार्य यांनी पंचीकरणाच्या व्याख्येंत असे म्हटलेले आहे:- -- जगृहे पौरुषं रूपं ' इति भागवतमुपन्यस्तं । 6 ( ४ ) शौनकाच्या ऋग्विधानांत खालील श्लोक आहेत:- अस्य यामा ऋचं जत्वा त्रिवारं विष्णुमंदिरे | फलं भागवतं तस्य लभते नात्र संशयः ॥ जप्त्वा आभरती - मंत्रं त्रिवारं च दिने दिने ।