Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरे, •. चित्सुखाचार्य हे शंकराचार्य परंपरेतील द्वारकामठांतील दुसरे पुरुष असल्यामुळे त्यांचा काळ इ० स० ८५० धरितां येईल. यांनीं भागव- तावर टीका लिहिली होती; तिचा मध्वाचार्य उल्लेख करितात; तसेंच, यांनी विष्णुपुराणावरही एक टीका लिहिली होती; पहाः - श्रीमच्चित्सुखयोगिमुख्यरचितव्याख्यां निरीक्ष्य स्फुटम् । तन्मार्गेण सुबोधसंग्रहवतीं आत्मप्रकाशाभिधाम् || श्रीमद्विष्णुपुराणसारविवृतिं कर्ता यतिः श्रीधर- । स्वामी सद्गुरुपादपद्ममधुपः साधुः स्वधीशुद्धये ॥ ७९ यावरून दुसराही एक उलगडा असा होतो की, चित्सुखानंतर श्रीधरस्वामी होऊन गेले. श्रीधरस्वामींनींही भागवत, विष्णुपुराण व भगवद्गीता यांवर टीका केलेल्या आहेत. सारांश, इ० स० ८५०-११८२ च्या दरम्यान श्रीधरस्वामी झाले. सुमारे ११०० हा त्यांचा काळ धरितां येईल. चित्सु- खांची टीका आज उपलब्ध नाहीं हें आमचें दुर्दैव होय ! श्रीशंकराचार्यांची भागवतावर टीका होती; इचाही उल्लेख मध्वाचा- यांनी केलेला आहे; पण हीही आज मिळत नाहीं. (इ०स०७८८-८२०) हनुमान्– ज्यानें भगवद्गीतेवर टीका लिहिली, विष्णुपुराणावर टीका लिहिली, हनुमान्नाटक लिहिलें, तो शंकराचार्य व चित्सुख यांहून प्राचीन- तर दिसतो. हनुमान्नाटक भोजाच्या वेळेस होतें, यावरून भोजापूर्वी हनुमान् होऊन गेला हैं ठरतें. हा चित्सुखांहूनही प्राचीनतर असावा. यानें हनुमान्नाटकांत कालिदासाचा ' ग्रीवाभंगाभिरामं मुहुरनुपतति ' हा श्लोक उतरून घेतलेला असल्यामुळे याचा काळ सामान्यतः इ० स० ६००-७०० हा धरितां येईल. तेव्हां यानें भागवतावर टीका लिहिली होती. हनुमती ( ६००-७०० ● . ), शंकरी ( ८०० ), चित्सुखी ( ८५० ) व