Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. “ It may, perhaps, be regarded as one of the oldest and most anthentic specimens, extant, of a primitive Parána. " डॉ. भांडारकरही या पुराणाबद्दल, निदान त्यांतील भविष्याच्या भागाबद्दल, आपल्या दक्षिणच्या इतिहासांत म्हणतात कींः – “ सर्वोत वायुपुराण हैं कालज्येष्ठ म्हणजे परम प्राचीन व त्याच्याहून कनिष्ठ मत्स्यपुराण होय असें आम्हांस वाटतें. विष्णुपुराण हैं मत्स्याहून कनिष्ठ व सर्वोत कालकनिष्ठ किंवा उत्तरकालीन म्हटलें म्हणजे भागवत. " ( मराठी भाषांतर पृ.६६.) प्रक्रिया प्रथमः पादः कथावस्तुपरिग्रहः । अनुषंग उपोद्घात उपसंहार एव च ॥ एवमेतच्चतुष्पादं पुराणं लोकसंमितम् । उवाच भगवान्साक्षाद्वायुर्लोकहिते रतः ॥ हल्लींचा वायुपुराणाचा पूर्वार्ध चार पादांत विभक्त आहे, असे. १ प्रक्रियापाद, २ उपोद्घातपाद, ३ अनुषंगपाद, ४ उपसंहारपाद. या पादांचा आरंभ होण्यापूर्वी अनुक्रमणिका दिलेली आहे. या दोन्ही गोष्टी गमतीच्या व महत्त्वाच्या असून त्या फक्त याच पुराणांत आढळतात:- ६९ - 5 आनंदाश्रमाचें वायुपुराण पांच हस्तलिखित प्रतींवरूत तयार केलेले आहे. यांतील १०४ था अध्याय फक्त एका क प्रतींत तेवढा आहे. ही क प्रत म्हणजे कलकत्याची छापील प्रत होय. मुंबईकडच्या प्रतीत हा अध्याय नाहीं. या अध्यायांत पुराणें व त्यांची संख्या सांगितलेली आहे. मत्स्यपुराणानें वायुपुराणाचें लक्षण याप्रमाणे सांगितलेलें आहे:- श्वेतकल्पप्रसंगेन धर्मान्वायुरिहाब्रवीत् । यत्र तद्वायवीयं स्याद्रुद्रमाहात्म्यसंयुतम् ॥ चतुर्विंशत्सहस्राणि पुराणं तदिहोच्यते ॥ मस्य, ५३-१८.