६८ पुराणनिरीक्षण. या दुसऱ्या शैवपुराणांतील वायुसंहितेशीं महापुराण जें वायु याचा कांहीं संबंध नाहीं; कारण यांची ग्रंथसंख्या वेगळी आहे. मुंबईच्या वेंकटेश्वरप्रेसमध्ये वरील शैवपुराणाखेरीज एक वायुपुराण छापलेलें आहे. त्यांत मात्र देवादिसृष्टिवर्णन, मन्वंतरांदिचतुर्युगाख्यान, पृथुवंशकीर्तन, श्राद्धक्रिया व गयामाहात्म्य इत्यादि विषय आहेत. हैं मात्र नारदोक्त वायुपुराणाचा पूर्वभाग दिसतें; तसेंच, आनंदाश्रमांत छाप- लेल्या वायुपुराणांत वरील सर्व विषय आहेत. त्यांत एकंदर ११२ अध्याय व जवळ जवळ ११ हजार श्लोक आहेत. आनंदाश्रम प्रतीच्या गणनेंत पुष्कळ श्लोकार्धीची श्लोकसंख्येत गणना केलेली नसल्यामुळे आणखी ५००/६०० श्लोक अधिक भरतील; व गयामाहात्म्य धरून हा वायु- पुराणाचा पूर्वार्ध १२ हजार ग्रंथ आहे असे मानण्यास हरकत दिसत नाहीं. विल्सन साहेबांस एक शिवपुराण मिळालें होतें त्याची संख्या ८ हजार भरली ! हें त्यांनी उपपुराणांत दाखल करून सोडलें. विल्सन साहेबांस गायकवाडसरकारकडून संवत् १५४० मध्ये लिहिलेली एक वायुपुराणाची प्रत मिळालेली होती; तथापि, ही प्रत देखील परिपूर्ण नव्हती अशी विल्सन साहेबांची खात्री झाली ! कारण, गायकवाडी प्रत फक्त १२ हजारांची असून तिला पुनः पूर्वार्ध म्हटलेलें आहे. सारांश, विलसनच्या प्रती, आनंदाश्रमाचें वायुपुराण व मुंबईत छापलेले वायुपुराण ही सर्व जवळ जवळ १२००० ग्रंथ असून, संपूर्ण वायुपुराणाचा फक्त पूर्वार्ध आहेत, असें नारदपुराणोक्त सूचीवरून कळून येईल. उत्तरार्धीत शिवसंहिता व रेवामाहात्म्य मिळून १२ हजार ग्रंथ असला पाहिजे. विलूसन साहेबांस मिळालेल्या वायुपुराणाच्या पूर्वार्धाबद्दल त्यांनी असे उद्वार काढिलेले आहेत:- -
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/८३
Appearance