प्रकरण दुसरें. संगमे साहितान्येवं रेवातीरद्वयेsपि च । चतुःशतानि तीर्थानि प्रसिद्धानि च संति हि || षष्टि तीर्थसहस्राणि पष्टि कोट्यो मुनीश्वराः ! । संति चान्यानि रेवायास्तीरयुग्मे पदे पदे || संहितेयं महापुण्या शिवस्य परमात्मनः । नर्मदाचरितं यत्र वायुना परिकीर्तितम् || नारदीयपुराणांत ज्या प्रकारची वायुपुराणाची अनुक्रमणिका आहे तीवरून देखील पूर्वार्धात शिवमाहात्म्य व उत्तरार्धीत रेवामाहात्म्य अशीच यांत व्यवस्था दिसून येते. नारदपुराणमतें गयामाहात्म्य पूर्वभागांतच आहे; पण दुर्भाग्य आमचें कीं ' गयामाहात्म्य ' व ' रेवामाहात्म्य ' हीं स्वतंत्र- पणेंच मिळत असून, चार पर्वांनी युक्त संपूर्ण वायुपुराण ( या दोन्ही माहा- त्म्यानें युक्त असें ) हल्लीं मिळत नाहीं. कलकत्त्याच्या एशियाटिक सोसा- इटीनें एक वायुपुराण नांवाचें पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे; परंतु, त्यांत चार पर्ने किंवा पूर्वभागांत गयामाहात्म्यही नाहीं. संपादकांनी आपल्या इच्छेनें याच्या शेवर्टी गयामाहात्म्य जोडून दिलेले आहे; याशिवाय, यांत शिवसंहिता किंवा रेवामाहात्म्य या उत्तरार्धीतील विषयांचें नांवही नाहीं ! मुंबई व कलकत्ता येथें शिवपुराण छापलेलें आहे; त्यांतही क्रमानें पूर्वोत्तर भाग व चार पर्चे दिसून येत नाहींत. या शिवपुराणांतील वायुसंहितेंत लिहिलें आहे कीं:- तत्र शैवं तुरीयं यच्छार्वे सर्वार्थसाधकम् । . ग्रंथलक्षप्रमाणं तद्व्यस्तं द्वादशसंहितम् || निर्मितं तच्छिवेनैव तत्र धर्मः प्रतिष्ठितः ।
- याविषयीं विशेष विचार ब्रह्मांडपुराणनिरीक्षणांत करावयाचा आहे.