Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. ‘मायामोहकथे ' चा या सूचींत उल्लेख असल्यामुळे भविष्यकालीन राजेही त्या वेळीं या पुराणांत बहुधा असावेत. असे ते असतील तर ही नारदी- पुराणसूची इ. स. ५०० - ६०० च्या दरम्यान बनलेली असावी असें मानणें जरूर पडेल; नाहीं पक्ष, ही सूची आणखीही १००-१२५ वर्षे प्राचीनतर ठरेल. कारण एरव्हीं, श्रीशंकराचार्योच्या वेळी विष्णुपुराण व विष्णुधर्मोत्तर हे वेगळे ग्रंथ आहेत अशी समजूत कशी पडावी ? हेमाद्रि व स्मृतिरत्नावलिकार यांनी बृद्विष्णुपुराणांतील म्हणून कांहीं श्लोक उतरून घेतलेले आहेत. हें पुराण हल्लीं उपलब्ध नसल्यामुळे, त्या- विषयीं कांहीं विशेष लिहितां येत नाहीं. काठेवाडांत कांहींच्या येथें अजून भरपूर २३००० श्लोकांचें विष्णुपुराण मिळतें अशी बातमी आहे. ६२ या पुराणावरही अनेक टीका आहेत; पैकीं श्रीधरस्वामींची प्रचलित व उपलब्ध टीकांत प्राचीनतम आहे. त्याही पूर्वीची चित्सुख यांचीही यावर टीका होती ! ( भागवतपुराण पहा. ) वायु ऊर्फ शैवपुराण, ४ थें. कोणी म्हणतात, शैव व वायुपुराण एकच आहे; कोणी म्हणतात की हे भिन्न आहेत. बाळंभट्टाचें मत असे आहे की जें शैवतेंच वायुपुराण होय. कांहीं पुराणांनी शैवा ' चा उल्लेख केलेला आहे व कांहींनीं ( 6 वायू ' चा केलेला आहे. विष्णु, पाद्म, मार्केडेय, कौर्म, वाराह, लिंग, ब्रह्मवैवर्त, भागवत व स्कांद यांत यास ' शैव ' पुराण म्हटलेलें आहे. मत्स्य, नारद व देवीभागवत यांत यास ' वायु पुराण म्हटलेले आहे. वायुपुराणाच्या रेवामाहात्म्यांत लिहिलें आहे कीं:- , पुराणं यन्मयोक्तं हि चतुर्थ वायुसंज्ञितम् । चतुर्विंशतिसाहस्रं शिवमाहात्म्यसंयुतम् ।