पुराणनिरीक्षण, तेव्हां व्यासांची आदिपुराणें प्रचलित असावत असे वाटतें. वरील उताऱ्यां- वरून प्राचीन आदिपुराणांची भाषा कळून येईल. २८ हल्लींच्या पुराणांतील बराचसा भाग जरी आदिपुराणांवरून घेतलेला असला तरी, त्यांतील बराच भाग अर्वाचीन आहे, निदान अर्वाचीन भाषेत आहे ह्यांत शंकाच दिसत नाहीं. आदिपुराणे व्यासांच्याच वेळचीं होत ! •आदिपुराणें व्यासांच्या वेळची असून त्यानंतर एकदोन पिढ्यांत तो सांगितली गेलीं यास प्रमाणे अशी मिळतात:- १ अर्जुन – यास स्वतः भगवंतांनी गीता सांगितली व ती व्यासांनी भारतांत गुंफिली ! २ अभिमन्यु ] । ३ परिक्षित् --यास शुक्राचार्यांनी व्यासोक्त मूळ भागवत सांगितले; तसेंच, याच्या काळीं पराशरानें मैत्रेयास मूळ विष्णु- पुराण सांगितलें. - बास वैशंपायन व जैमिनि यांनी आपापली भारतें ऐकविली ! ४ जनमेजय- T ५ शतानीक—यास सुमंतूनें मूळचें भविष्यपुराण सांगितलें. ६ अधिसोमकृष्ण - हा राज्य करीत असतांच सूतानें मूळ मत्स्यपुराण ( ५० - ६६ ) व मूळ वायुपुराण ( १-९२ ) ऋषींस सांगितलें ! या प्रमाणांवरून ' आदिपुराणें व्यासांनींच प्रचलित केली हें स्पष्ट दिसून येतें.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/४३
Appearance