पुराण- शोधक-ग्रंथमाला. यनशास्त्र ज्यास अशक्य मानितें असें कृत्रिम सुवर्ण बनविण्याच्या अनेक क्रिया या उताऱ्यांतून आढळतात. किंमत अवघी दीड रुपया. . या मालेतील साहावें पुस्तक. आर्यवैद्यकावर नवा प्रकाश. , हैं निघेल. यांतील विषयसूची अशी आहे. विद्युतचे वैद्यकींत उपयोग- पावसांतील वीज-एलोक्ट्रो होम्योपॅथी-शरीराचें ध्रुवत्व- फळांतील बीज- अन्नाचा सदुपयोग व दुरुपयोग - योगशास्त्र व विद्युत् प्राण, अॅनिमल मॅग्नेटिझम्, व्हॅटॅलिटि, वात हे सर्व एकच होत- मंत्रशास्त्र व विद्युत् - जड व चैतन्य विद्युत्-रोगोत्पत्ति कशी होते? स्वरोदयशास्त्र-डॉड्स यांच्या विद्यु- न्मानस शास्त्रांतील 'हवेंतील विद्युत्'च आमच्या योगशास्त्रांतील 'प्राण व वैद्यकांतील 'वात ' होय ! प्राणवर्धक पदार्थ व कृत्यें ! किंमत १ रु. याप्रमाणें तूर्त सहा पुस्तकांची योजना केलेली आहे. पुढेही नवीन पुस्तकें तयार झाली म्हणजे वाचकांस पूर्वीच्या पुस्तकांतून कळविण्यांत येतील. या ग्रंथमालेस कायमचे वगणदार होऊन वाचकांनी आमच्या पुराणवस्तुशोधनकार्यास ( Antiquarian Research ) मदत करावी अशी विनंति आहे. आपला सर्वोचा नम्र सेवक, वैद्य -- त्र्यंबक गुरुनाथ काळे, मु. पनवेल, जि. कुलाबा. अठराही पुराणांची सुंदर आवृत्ति.
:०:
सुमारें १००० ग्राहक जमतील तर अठराही पुराणांची एक सुंदर आवृत्ति काढण्याचा आमचा विचार आहे. अठरा पुराणे मिळून चार