प्रकरण सहावें, ३१७ • गेल्यावर शालिशूक राज्यावर बसला असें म्हणावयाचें होतें असें वाटतें; व याप्रमाणें शुद्ध पाठभेद एकाद्या प्रतीत आढळत असावा. याप्रमाणे इ. पू. ३१२ ( चंद्रगुप्ताभिषेक ) या वेळी जो दक्षकाळ ५४६२ वर्षोचा होता तो शालिशूकाचे काळी ९० वर्षांनंतर कांही काळानें ( ५५०५ किंवा ) ५५५० वर्षे - अगर बरोबर ५५५५ वर्षांचा होता. ५५५० वर्षे धरिली तर शालिशूकाचा काळ चंद्रगुप्तानंतर ८८ वर्षांनी येतो. पण संप्रति अशोकाचा नातु ९० व्या वर्षी राज्यारूढ झाल्यामुळे व त्यास २|३ वर्षे तरी राज्य देणें जरूर असल्यामुळे ५५५५ दक्षकाळ हाच शालिशूकांच्या अभिषेकाचा काळ धरावा लागतो; म्हणजे हा काळ इ. पू. २१९ हा येतो. " सारांश, पूर्वकल्पांत डोकावून पहातां इ. पू. ५३८ प्रळय झाला; व त्याहून पूर्वी ४०० वर्षीच्या सुमारास दक्ष व कश्यप प्रजापति झाले ही हकीकत कळून आली ! पूर्वकल्पांतील चाक्षुष मन्वंतरा- पूर्वी अद्यापि अंधेर आहे; तथापि, मनूच्या प्रळयापूर्वीही दक्षादिप्रजाप- तींचें अस्तित्व असल्याची हकीकत कळून येऊन, त्यायोगें ग्रीकांनी दिलेल्या इ. पू. च्या सुमारच्या भारतीय कालगणनेवर प्रकाश पडला. त्याच- सुमारच्या शालिशूक राजाचा काळ दक्षापासूनच ५५५० किंवा ५५५५ वर्षे असल्याचा वृद्धगर्ग उल्लेख करितो, ही कांहीं कमी महत्त्वाची गोष्ट नव्हे. सारांश, पूर्वकल्पांतील मुख्य मुख्य गोष्टी कळल्यासारख्या झाल्या ! वराहकल्पांतील हकीकती हल्ली थोड्या थोड्या माहीत आहेल म्हणून ' श्वेतवराहकल्प ' असे चालू कल्पास म्हणत असावेत. – श्वेतकल्पाचा प्रारंभ अर्थातच इ. पू. (३१०२ + ४०३२ = ) ७१३४ या वर्षी सुरू झाला असावा. याही कल्पापूर्वी एकंदर किती कल्प होऊन गेले व तेव्हां काय गोष्टी घडून आल्या-याविषयीं बिलकुल माहिती — निदान सध्यांच्या पुराणांवरून तरी कळून येत नाहीं. =
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३३२
Appearance