Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें. cited by Mr. Bailly from the creation to the flood. This famous astronomer derived his ideas about the time of the Creation and of the Flood, from the learned Hindus he had consulted, and he assigns 2226 two thousand two hundred and twenty six years between what the Hindus call the last renovation of the world and the flood. 33 * या उताऱ्यावरून ग्रीकांचे आंकडे ५४५१ व ५४६२ असेही अस- त्याचें कळतें; शिवाय, इ. पू. नवव्या शतकांतील अरबी लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे, हिंदुलोक हल्लींच्या कल्पापासून ( Renovation of the world) प्रळयापर्यंत (lood) २२२६ वर्षे गेलीं असें मानीत असल्याचेंही कळतें. हल्लींचा कल्पारंभ इ. पू. ३१०२ वर्षी मनूच्या वेळी झाला; यापूर्वी २२२६ वर्षे म्हणजे इ. पू. ५३२८ वर्षे झाला, असें अल्बुमझरच्या मतें भारतीय प्रमाणांवरूनच ठरतें. प्रळयाचा हा काळ ( इ. पू. ५३२८ ) आमच्या पुराणांतील प्रमाणांशी जुळतो की नाहीं हैं आपण पाहूं. मत्स्यपुराणाच्या आरंभी चाक्षुष मन्वंतराचा क्षय झाल्या- नंतर ( म्हणजे चाक्षुष मन्वंतर संपल्यानंतर ) मनूच्या वेळी प्रळय झा- ल्यांचा उल्लेख आहेः– त्वया सार्घमिदं विश्वं स्थास्यत्यंतरसंक्षये । एवमेकार्णवे जाते चाक्षुषांतरसंक्षये ॥ १- १४ ॥ यावरून पूर्वकल्पाचें चाक्षुष मन्वंतर संपल्यानंतर लौकरच मनूच्या वेळी प्रळय झाला हे कळून येतें. मागें चाक्षुष मन्वंतराचा काळ इ. पू. ५६९४ ते ५४०८ होता हैं दाखविलें आहे. चाक्षुषापुढील मन्वंतर वैव- स्वतच होय; हैं इ. पू. ५४०६ ते ५११८ पर्यंत होते. तेव्हां अल्बुमझ- रच्या मतें जो प्रळयाचा काळ इ. पू.५३२८ येतो, तो या वैवस्वत मन्वं- 2

  • Selections from the Asiatic Journal Vol. I, P. 294