Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें. 'भाग तो भारतवर्ष; पश्चिमभाग तो इलावर्ष; उत्तरभाग तो उत्तर- कुरुवर्ष व पूर्वभाग तो भद्राश्ववर्ष, उत्तरकुरुवर्षाच्या उत्तरेस उत्तरसमु- द्रापर्यंत जो प्रदेश तो शाकद्वीप. २९९ रा. राजवाडे कांहीं स्थळांची अर्वाचीन नांवें व ऐक्यें ( Identifica- tions ) देतात:- जम्मू-जंबू; हिंदुकुश - हेमकूट; इलाम इलावृत्त; अशूर- असुर; बाबिलोन वर; पेलारूज = लक्ष; कौशियन-कुश; स्किथियन = शक; पर्शु = पल्हव ही नांवांची साम्यें काल्पनिक किंवा आकस्मिक नाहीत; हैं पुरातन भूवर्णन आहे. तैग्रिस व बाबिलोनच्या उत्तरेस राहणारे लोक असुर होत. असुर व वर्बर लोकांचे इष्टिकालेख जसजसे प्रकाशांत येतील, तसतसा भारतवर्षाच्या प्राचीन इतिहास व भूगोल यांवर प्रकाश पडेल अशी आशा वाटते. रा. राजवाडे यांनी हिंदुस्थानांतील बकासुर, मयासुर यांबरोबरच जरासंध, शिशुपाल व कंस यांस असुरांत ओढिलें आहे ! ! पण ती चूक होय. शिशुपाल व कंस हे आर्य क्षत्रिय होते. जरासंधास कोणीही असुर म्हटलेलें नाहीं ! किन्नर किंवा किंपुरुष ! यांसच पाश्चात्य ग्रीक वगैरे लोकांनी Cimmerians किंवा Kinnie- rians म्हटलेलें आहे. जंबूद्वीपांत किंपुरुषवर्ष किंवा किन्नरवर्ष हा एक भाग होता; हे शकांपैकी जे मंद लोक त्यांहून भिन्न होते; पण हे उमन-मंदच होते ( Umman Manda ) असें His Hist. of the World कार म्हणतो. देव व मानव. जंबूद्वीपाच्या मधोमध असणाऱ्या मेरूच्या आसपास राहणारे ते देव असून त्यांचे अनुचर ते मानव होत; व या मानवांसच भारतवर्षात वस्ती केल्यावर आर्य हैं नांव मिळालें, असें राजवाडे यांचे मत आहे.