पुराणानिरीक्षण, लोकांस Kosseans म्हणत. इ. पू. १७८३च्या सुमारास इलाम प्रांताच्या पर्वतांमधून कोशिय येऊन बर्बर देशावर राज्य स्थापिलें. " कडाफा- सांस व कनिष्क हे कुश ऊर्फ कूशन होते, हे कोशियन ( कूशन ) कोठें राहात असत याबद्दल लिहिलेले आहे, की:– “ग्रीसच्या पूर्वेस शॉग्रॉस पर्वताच्या विनरस्त्याच्या प्रदेशांत, कोशियन लोक राहत असत. " (H. Hist. of the world, Vol. I, P. 341.) क्रौंचद्वीप. २९८ घृतोदाच्या पश्चिमेस क्रौंचद्वीप सध्याच समरकंद व बुखारा शहरें असलेला टापू असें रा. राजवाडे यांचें मत आहे. शाकद्वीप. क्रौंचद्वीपाच्या पूर्वेस उत्तर समुद्राच्या अलताई पर्वताच्या दिशेनें शाकद्वीप होतें. या द्वीपांत मग, मशक, मानस व मदंग असे चार वर्ण असत. मागें यांविषयीं उल्लेख आलेलाच आहे. पुष्करद्वीप. सध्याच्या चीनच्या उत्तरेकडील जो भाग तो पुष्करद्वीप होय, असे रा. राजवाडे यांचे मत आहे. मानसोत्तरपर्यंत म्ह कुएनलन असून त्यानें पुष्करद्वीपाचे दोन भाग होतात. एकश्चात्र महाभाग प्रख्यातो वर्षपर्वतः । मानसोत्तरसंज्ञो वै मध्यतो वलयाकृतिः ॥ ७५ ॥ पुष्करद्वीपवलयं मध्येन विभजान्नव । स्थितोऽसौ तेन विच्छिन्नं जातं तद्वर्षकद्वयम् ॥ ७७ ॥ विष्णु पु. २-४. जंबूद्वीपाच्या पश्चिमेस प्लक्षद्वीप व पूर्वेस पुष्करद्वीप, उत्तरेस शाल्मलि - द्वीप, कुशद्वीप व शाकद्वीप; व या सर्वोमध्ये जंबूद्वीप, जंबूद्वीपाचा दक्षिण
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३१३
Appearance