२९२ पुराणनिरीक्षण. अर्जुन, जनमेजय इत्यादिकांचा व कौत्साचा उल्लेख केलेला आहे. विद्वान् कौत्स यांच्या वेळी म्हातारा होता. यावरून या ग्रंथकारांचा काळानुक्रम मागील पानांत दिलेल्या कोष्टकाप्रमाणे लागतो:- याप्रमाणें अर्वाचीन राजांच्या बरोबरचं अर्वाचीन ग्रंथकारांचाही इति- हास व काळनिर्णय येथें सांगितलेला आहे. व्याडिशौनकांच्या शिष्य गुरु संबंधामुळें व शौनकाचा काळ कल्प २००० - २०१२ हा ठरल्यामुळे पाणिनीस इ. पू. ११०० च्या अलीकडे आणतांच येत नाहीं. त्यानें जन- मेजय व वैशंपायन यांचा उल्लेख केलेला असल्यामुळे त्यास त्यांच्यानंतर ठेवणें जरूर आहे. यावरून इ. पू. १२०० - ११६० हा त्याचा काळ अगदर्दी बरोबर दिसतो. असो. इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् । बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रतरिष्यति ॥ भारत. या प्रकरणावरून, भारत ( इतिहास ) व पुराणे यांच्यायोगें वैदिक ऋषि व त्या काळची परिस्थिति यांवर कसा प्रकाश पाडितां येईल व भारतीय इतिहास काळपरिगणनेसह ( Chronology ) कसा लि- हितां येईल याची वाचकांस चांगलीच कल्पना आली असेल. मागचा इतिहास शोधून काढणें पुढील पिढीकडे सोपविलें पाहिजे.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३०७
Appearance