प्रकरण चौथें, २९१ भवस्तत्र सत्रे पारीक्षितस्य हि ॥' असे म्हटलेलें आहे. या वेळी विद्वान् कौत्स म्हातारा होता. याचा पाणिनि उल्लेख करतो. हा पिंगल वेदपारग आहे. याचा बंधु पाणिनि यावरून जनमेजयाच्या हा समकालीन ठरतो. जनमेजयाची कारकीर्द कल्प ( १८३९ + १५ + ६० =) १९२४ ला सुरू झाली. हा पाणिनि कल्प १९०० च्या सुमारचा असावा; म्हणजे इ० पू० १२०० च्या सुमारचा असावा. पाणिनीनें पाराशर्य, वासुदेव, परीक्षित् जन्म, कल्प १८३९ इ. पू. १२६३ जनमेजय पाणिनि- पिंगल शौनक-व्याडि यास्क * कात्यायन $ पतंजलि चद्राचार्य ( अभिमन्यु ) नागार्जुन वसुरात भर्तृहरि ( वाक्यपदीयाचा कर्ता ) १२००- ११६० ११०० सुमारें. १००० ● ५००-४०० सुमारें. १४० इ. पू. ७५-४० इ. पू. ४८० इ. स. ६१० इ. स. सुमारें.
- यास्क यास पाणिनि व शौनक यांहून अर्वाचीन कां धरावें ? याविषयीं
सविस्तर विवेचन पंडित सत्यव्रत सामश्रमि यांनी आपल्या निरुक्तालोच- नांत केलेले आहे. $ या कात्यायनाचा शिष्य मगधदेशचा महानंदिराजा होता असें भविष्य पुराण म्हणतें:- पुनः क्षत्रत्वमगमन्मागधं स महीपतिः ॥ ५ ॥ महानंदीति विख्यातो राजनीतिपरायणः । कात्यायनस्य शिष्योऽभूत् महाशास्त्रस्य धीमतः ||६|| भविष्य पु. प्रतिसर्गपर्व, खंड २, अ ३४.