Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणानिरीक्षण. मन्वंतर-पद्धतींतील काळ. युगे व मन्वंतरै या पद्धतींत जसा वेदसंहितारचनेचा व भारतीय युद्धाचा काळ दिलेला आहे तद्वतच इतर कांही गोष्टींचा काळ कांहीं तरी पुराणांतून दिलेला आहे की काय, असा आतां प्रश्न उपस्थित होतो; याचा आतां विचार करूं: - २६४ मत्स्यपुराणांत असे कांहीं महत्त्वाचे काळ दिलेले आहेत:-- त्रेतायुगे तु प्रथमे दत्तात्रेयो* बभूव ह । नष्टे घर्मे चतुर्थांशे मार्केडेयपुरःसरः ॥ २४२ ॥ पंचमे पंचदश्यां च त्रेतायां संबभूव ह । मांधाता चक्रवर्ती तु तदोत्तंकपुरःसरः ॥ २४३ ॥ एकोनविंश्यां त्रेतायां सर्वक्षत्रांतकृद्विभुः ॥ जामदग्नयस्तथा षष्ठे विश्वामित्रपुरःसरः || २४४ ॥ चतुर्विंशे युगे रामो वसिष्ठेन पुरोधसा । सप्तमे रावणस्यार्थे जज्ञे दशरथात्मजः ॥ २४५ ॥ अष्टमे द्वापरे विष्णुडरष्टाविंशे पराशरात् । वेदव्यासस्तथा जज्ञे जातूकर्ण्यपुरःसरः || २४६ ॥ बुद्धो नवमके जज्ञे तपसा पुष्करेक्षणः ।

  • हा अत्रि ऋग्वेदांतील ग्रहणाचें अवलोकन करणारा व स्मृतिकार असावा.

त्याचा पुत्र दत्त असावा. ‘ कृते त्वात्रः समाख्यातो त्रेतायां गौतमोऽपि च । द्वापरे शंखलिखितौ कलौ पाराशरी स्मृतिः ॥ " याप्रमाणें स्मृतिकार सांगितलेले आहेत. 'शूद्रावेदी पतत्यत्रेः ' ( ३ – १६ ) असा मनूंत याचा उल्लेख आहे.