प्रकरण तिसरें. २५३ पोंचविली आहेत. तीं सुमारें इ० पू० १२०० वर्षी संपली. तेव्हां १८४० + १२०० + अलीकडची १९१० ह्रीं सारी वर्षे मिळविली तर ४९५० वर्षे होतात व हीं कलीच्या वर्षीपेक्षां ६० वर्षीनींच कमी आहेत. हा ६० वर्षांचा काळ - ब्राह्मण काळाचा अंत व इ० स० १२०० हा बौधायनाचा काळ-यांमधील अंतर असावा. गवामयनं हें चार वर्षीच्या युगांचें दर्शक आहे. हें चतुर्युग किंवा नुसतें युग होय. पंडित रुद्रपट्टण शामशास्त्री यांच्या ' गवामयनं ' या पुस्तकांत असें मत आहे कीं, ही वैदिक कालगणना नाभानेदिष्ट यानें सुरू केली. आपण सध्या ज्यास कलियुग म्हणतो ती खरोखर वैदिक काल गणनाच आहे, असे त्यांचे मत आहे. पौराणिक ग्रंथांतून या चार वर्षीच्या युगांचा उल्लेख कोठकोठे आहे असें मला वाटतें. सुमारें १८४० वर्षीत १५ दिवसांची चूक पडल्यामुळें वेदांगकाळी ४ वर्षीच्या युगांची पद्धति सोडून पांच वर्षीच्या युगांची पद्धति सुरू झाली असावी. व्यासांच्या वेळीं चार वर्षांची युगे चालू होतीं व प्रत्येक वर्षास ( मागें दिल्याप्रमाणें ) युगाचें नांव होतें, असें दाखवितां येतें. त्या वेळचें कोष्टक असें होतें:- - ४ वर्षे = १ युग = १ चतुर्युग, ७२ युगे म्ह. चतुर्युगें = १ मन्वंतर = २८८ वर्षे. १४ मन्वंतरें = १ कल्प = ४०३२ वर्षे, मन्वंतरें. मन्वंतरें ही कालगणनेचीं द्योतक असून तीं ४ वर्षांच्या ७२ युगांचीं म्हणजे २८८ वर्षांची असली पाहिजेत.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६८
Appearance