Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४५ प्रकरण तिसरें, होऊन गेला असावा; व पहिल्या गोनर्दापासून याच्या अखेरपर्यंत कल्ह- णानें दिलेल्या पहिल्या जुन्या परंपरेप्रमाणें १२६८ वर्षे गेलीं ! या प्रमा- णानेंही भारतीय युद्धाचा, पांडवांचा व पहिल्या गोनर्दाचा काळ इ. पू. .१२६३ असण्यास कांहींच हरकत नाही. ( आस- कल्हणानें पांडव गतकाल ६५३ वर्षी मानलेले आहेत व न्मघासु मुनयः ' याचा चुकीचा आधार दिलेला आहे. तिसऱ्या गोनर्दा- पासून तो शके १०७० पर्यंत प्राय: २३३० वर्षे असें जें कल्हणानें म्हटले आहे, तें बहुधा तिसऱ्या गोनर्दापासून नसून दुसऱ्या किंवा पहिल्या गोनर्दापासूनच असावें; असें धरिल्यासही पांडवांचा काळ [ २३३०- ( १०७० + ७८ ) म्हणजे ] इ. पू. ११८२ येतो. हा काळ दुसऱ्या गोनर्दापासून धरिल्यास व पहिल्या ते दुसऱ्या गोनर्दापर्यंतची ७१ वर्षे यांत मिळविली तर इ. पू. १२५३ हा पहिल्या गोनर्दाचा काळ येतो. २३३० वर्षे हीं बरोबर नसून प्राय: असल्यामुळे व यशोवतीच्या राज्यवर्षीची संख्या दिलेली नसल्यामुळे इ. पू. १२५३ हा पहिल्या गोनर्दाचा काळ येतो. तिचा कांहीं काळ मिळविला तर पहिल्या गोनर्दाचा आम्ही ठरवि- लेला इ. पू. १२६३ हाच काळ येईल. पण यास २३३० वर्षे सुमारें दुसऱ्या गोनर्दापासून शके १०७० म्ह. इ. स. ११४८ पर्यंत गेलीं असें मानावें लागतें, व हेंच संभवनीय आहे. यास पुढेही कारणे दिलेली आहेत. कल्हणानें काश्मीरी इतिहासाच्या काळगणनेंत भारीच गोंधळ उड वून दिलेला आहे. त्याच्यापुढे, मागें सांगितलेल्या दोन परंपरा होत्या; पैकी दुसरी परंपरा कल्हणमतें जरा विपर्यस्त केलेली असावी. या दोन्ही परंपरा मी काढलेल्या भारतीय युद्धाच्या काळाला ( इ. पू. १२६३ ) कशा पोषक आहेत हैं' वर दाखविलेलेच आहे. या दृष्टीनें काश्मीरी काळ असे ठरविणें जरूर आहे.