२३१ प्रकरण तिसरें. किल यवनांवरून व त्यांच्या वाकाटकवंशीय राजांच्या ऐक्यावरून एवढें म्हणतां येईल की, या पुराणांस सद्यःस्वरूप इ० स० ६०० ते ७०० च्या मध्यंतरी किंवा थोडेंसें नंतर मिळालेलें असावें. विष्णु व भागवत यांस तर ७०० च्या आंतच हें स्वरूप मिळालेले आहे. वायु व मत्स्य यांस मात्र याहूनही थोडेसें पूर्वी म्हणजे इ० स० ४०० ते ५०० च्या दरम्यान मिळाले असावें. याची कारणें त्या त्या पुराणांच्या विवेचनांत दाखविण्यांत आली आहेत. पुराणांवर किती संस्कार झाले १ हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून, याचा उलगडा एकंदर भविष्य- त्कालीन राजांच्या घोटाळ्यांच्या हकीकतीवरून होण्यासारखा आहे; तो असाः - ( १ ) व्यासांनी एका पुराणांचीं अठरा पुराणे बनविलीं ! त्या वेळच्या पांडवांच्या व श्रीकृष्णांच्या हकीकती त्यांत त्यांनी घालून काला- नुगामित्व आणिलें ! ( २ ) कालानुगामित्व आणण्याच्या सद्धेतूनेंच विक्रमादित्यानंतर थो- ड्याच काळानें सर्व पुराणें कोण एका सूतानें पुनरुक्त केलीं ! तेव्हां बहुधा त्यांत ' नंदातं क्षत्रियकुलं ' व ' परिक्षितीपासून नंदाच्या ( म्ह० महानंदाच्या) अभिषेकापर्यंत ८३६ वर्षे व चंद्रगुप्त ऊर्फ महादेव यापर्यंत ९५१ वर्षे झाली ' अशी परंपरा असावी. या वेळच्या लेखकाच्या मनांत बेरजांचा घोटाळाच नसावा. चंद्रगुप्तापर्यंतचा परंपरेचा काळ त्यानें देऊन ठेविला असावा. त्यास नवनंदांचा काळ ७२ वर्षे हैं पक्के माहीत असले पाहिजे; पण त्यानें तर्से स्पष्ट लिहून ठेविलें नाहीं-त्यास त्याचें महत्त्व
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२४६
Appearance