Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. उताऱ्यांतील शेवटच्या ओळीवरून आणखी एक मजेचा उलगडा होतो तो असा की, इतक्या भिन्न भिन्न काळच्या शेंकडों, हजारों-नव्हे पद्मो- गणती राजांच्या कथा क्रमानें त्या त्या काळीं अनेक विद्वान् कवींनीं लिहून व्यासांपूर्वीच्या एका पुराणांत त्यांचा समावेश केलेला होता. यावरून हैं सर्व पौराणिक वाङ्मय बरेंच विस्तृत असले पाहिजे असे वाटतें. व्यासांच्या वेळी अनेक काळच्या राजांची आख्यानें असलेले पौराणिक वाङ्मय़ अनेक कविसमूहांकडून प्रवर्तित होतें. मग हें सर्व मिळवून व्यासांनीं त्या पुराणाच्या अठरा संहिता केल्या असाव्या हैं बरोबर दिसतें. वेदांचीं जशीं निरनिराळ्या काळच्या कवींनी प्रणीत सूक्के जमवून व्यासांनी संहिता केल्या, त्याचप्रमाणें भिन्न भिन्न कालीन कविप्रणीत अनेक पौरा- णिक वाङ्मय जुळवून त्याच्या त्यांनी अठरा संहिता केल्या असाव्या. हैं पौराणिक वाङ्मयाच्या वाढीच्या इतिहासाशींही जुळतें; व हेंच विष्णु- पुराणांत खालील शब्दांनी सांगितलेले आहे:- - आख्यानैश्चाप्युपाख्यानैर्गाथाभिः कल्पशुद्धिभिः । पुराणसंहितां चक्रे पुराणार्थविशारदः || प्रख्यातो व्यासशिष्योऽभूत् सूतो वै रोमहर्षणः । सुमतिश्चाग्निवर्चश्च मित्रयुः शांशपायनः । अकृतव्रणोऽथ सावर्णिः पशिष्यास्तस्य चाभवन् । काश्यपः संहिताकर्ता सावर्णिः शांशपायनः । रोमहर्षणिकाश्चान्याः तिसृणां मूलसंहिताः ॥ चतुष्टयेनाप्येतेन संचितानामिदं मुने । आद्यं सर्वपुराणानां पुराणं ब्राह्ममुच्यते ॥ अष्टादश पुराणानि पुराणज्ञाः प्रचक्षते ॥