Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. एके दिवशी पाटलिपुत्रांत फिरत असतां, नवा राजा निवडण्यासाठी पट्ट- इस्ती निघाला होता. त्या हत्तीनें नंदिवर्धनाच्या छत्रधराच्या (नोकराच्या ) गळ्यांत माळ घातली ! पण नोकरानें यजमानाचें यजमानत्व स्मरून नंदि- वर्धनासच राजा ठरविलें — व स्वतः त्याचा दास म्हणवूं लागला. याप्रमाणें नंदिवर्धन व त्याचा दास ( यासच बौद्धांनी नागदासक म्हटलें आहे, व पुराणांनी दर्शक म्हटले आहे ) या दोघांनी मिळूनच राज्य केलें ! * २१० यानंतर महानंदि- त्याचा पुत्र राज्यावर आला. त्याचा पुत्र शूद्रेच्या ठाई महापद्मनंद झाला. महानंद (दि ) च बौद्धांचा कालाशोक होय हैं मार्गे दाखविलेलें आहे. कालाशोक ऊर्फ महानंद याचे १० वे वर्षी गौत- माच्या निर्वाणापासून १०० वर्षे झाली. भारतीय युद्धापासून याच्या अभि षेकापर्यंत ८३६ वर्षे गेलीं ! हाच मगध देशचा शेवटचा क्षत्रिय राजा होय ! यालाच उद्देशून पूर्वीच्या पुराणांनीं 'नंदांतं क्षत्रियकुलं ' म्हटले असावें; कारण यानें ‘ ज्या नंदानें क्षत्रियकुल संपलें तो शेवटचा राजा क्षत्रियच असावा,' असा बोध होतो ! असो. महानंद ऊर्फ कालाशोक याचा शूद्रेच्या पोर्टी झालेला पुत्र महापद्मनंद होय ! हा शूद्र म्हणून त्या वेळच्या अस्सल क्षत्रिय राजांनीं यास भरदरबा- रांत मुजरा करण्याचें नाकारिलें ! तेव्हां सर्व क्षत्रियांचा यानें फन्ना उड- वून दुसरा परशुराम–क्षत्रियांतकर अशी पदवी मिळविली. ही गोष्ट इ. पू. ३८४ सालीं घडली हैं मागें दाखविलेलेच आहे. याच्याविषयी पुराणांनी म्हटले आहे कीं:- - महानंदिसुतश्चापि शूद्रायां कलिकांशजः । उत्पत्स्यते महापद्मः सर्वक्षत्रांतको नृपः ।

  • ही हकीकत प्रबंधचिंतामणीत आहे. नंदिवर्धन हा उदायीचा पुत्र नसून

प्रद्योतवंशांतील राजपुत्र ( उज्जनीचा ) दिसतो !!