Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरें, ततो भरतवंशांते भूत्वा वत्सनृपात्मजः । हा वहीनर बौद्धधर्माचा चांगलाच आश्रयदाता होता. याच्या नांवाचें एक सूत्रांतच आहे, व विनयपिटकांत याविषयीं अधिक माहिती आहे असें म्हणतात. २०९ शेवटचा जो क्षेमक तो महापद्मनंदाकडून मारला गेला; येथें भरतवंश संपला ! क्षमकापर्यंत कुरुवंशांत २६ राजे झाले असें मात्स्यानें सांगितलेलें आहे:- “ कुरवश्चापि षड्विंशाः” ( २७२~१५ ). मगध देशचे राजे – गौतम बुद्धाचे वेळीं मगध देशची राजधानी राजगृह होती. तेथें तेव्हां बिंबिसार राजा राज्य करीत असे; यासच जैन श्रेणिक म्हणत. मात्स्यानें याचा ' राजानः श्रेणिबुद्धाश्च ' असा एके ठाई उल्लेख केलेला आहे. अजातशत्रूनें ( कुणिकानें ) बापास कैदेत टाकून त्यास अन्नावांचून तडफडाट करवीत मारिलें ! हा जात्या भारी दुष्ट होता. अजातशत्रूनें आपली राजधानी चंपानगरी केली. हा प्रथम जैन धर्मास अनु- कूल होता, पण पुढे हा बौद्धांकडे वळला ! वस्तुतः याचें धर्माकडे मुळींच लक्ष नव्हतें ! पुढें यास पश्चात्ताप होऊन, पितृवधाचें प्रायश्चित्त काय म्हणून तो बौद्धांस विचारूं लागला ! गौतमानें पुष्कळ उपदेश करून त्याचें मन शांत केलें, पण त्यास पितृघ्न म्हणून त्यानें संघांत घेतलें नाहीं. याच्या 'आठव्या वर्षी गौतमबुद्ध निर्वाण पावला. शेवटीं बुद्धाच्या मरणानंतर त्याच्या अवशेषावर यानें स्तूप बांधून आपली बुद्धभक्ति व्यक्त केली ! बौद्धधर्माची पहिली महासभा भरली तेव्हां यानें सप्तपर्णी गुहेसमोर महामंडप बांध- वून दिला ! असो. उदायीनें पुढें कुसुमपूर स्थापन केलें. त्याचें राज्य लोकांना किती जाचक झालें व तो कसा मारला गेला हैं मागें आम्ही दिलेलेच आहे. याचा खून झाल्यानंतर, नंदिवर्धन नांवाचा राजपुत्र व त्याचा नोकर १४