Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९९ प्रकरण तिसरें. fot allied ( inferior ) to the Royal family ** ** ** It also gives the history of the other nine. " या महावंशाच्या टीकेवरून, कालाशोक हा नवनंदांचा बाप होता, व नंदां- पैकी पाहिला पुत्र शूद्रेपासून जन्मला होता ह्या गोष्टी सिद्ध होतात. हें वर्णन पुराणांतील महापद्माला लागू पडत नसून त्याचा बाष जो महानंद त्याला लागू, ' पडतें. यावरून महानंदाच्या राज्याचे वेळीं बुद्धापासून १०० वें येऊन गेलें होतें हैं सिद्ध होतें. कालाशोक ऊर्फ महानंद याच्या राज्याच्या १० वे वर्षी निर्वाणानंतरचें १०० वें वर्ष होतें. तेव्हां, त्याचें राज्य निर्वाणा- नंतर ९० वर्षोन सुरू झालें हैं उघड आहे. पुराणांतील यादींप्रमाणें अजातशत्रूची बाकीची* १७ + उदायीच ३३ + नंदिवर्धनाची ४० मिळून ९० वर्षे महानंदापर्यंत झाली. तेव्हां या दृष्टीनेंही महानंदच काला- शोक ठरतो व पुराणांत या राजांचे दिलेले काल ऐतिहासिक दृष्टया बरोबर ठरतात. कालाशोकाचे पुत्र नवनंद असून महावंसोनें चुकीनें कालाशोकाची गणना नंदांतच केलेली आहे. एकंदर नंदांची वर्षे महावंशोनें ( काला- शोकास नंद घरून ) २८ + २२ + २२ = ७२ दिलेली आहेत, हीच संख्या जैनांनी नंदांस दिल्याप्रमाणे वाटतें. कारण, महावीराच्या निर्वाणापासून उदायीच्या मरणापर्यंत ६० वर्षे झाली; त्यानंतर १५५ वर्षांनी चंद्रगुप्त राज्यावर आला; पुराणमतें मधील राजांचा काळ हा:--

  • बुद्धनिर्वाण अजाशतत्रूच्या ८ व्या वर्षी झालें, अशी बौद्धपरंपरा आहे

महावंसो पहा ).