Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. बृहद्गागींसंहितेंतील उताऱ्यावरून हा उदायी शिशुनागवंशांतील होता हैं तर स्पष्टच होत आहे. आतां या शिशुनागवंशाची तपासणी करूं. पुराणां- तून शिशुनागवंशांत १० राजे सांगितलेले आहेत. या वंशांतील राजांच्या अनुक्रमांत पुराणांतून घोंटाळा आढळतो. आनंदाश्रमांतील वायुपुराण तपासून पाहिले तर असे आढळतें कीं, क्षत्रौजा हा अजातशत्रु व बिंबिसार यांच्या मध्यंतरीं घातलेला आहे;व त्यामुळे अनुक्रम, अजातशत्रु, क्षत्रौजा, बिंबिसार, दर्शक, व उदायी असा झालेला आहे; पण हा अनुक्रम चुकीचा होय. भागवतानें बिंबिसारापूर्वी अजातशत्रूला आणून ठेविला आहे; पण त्यांच्या- मध्ये क्षलौजा नाहीं. दहा शिशुनागराजांपैकीं दर्शक एक असला तरी तो विं- बिसाराचा कोणीतरी पूर्वज असावा असे वाटतें. विष्णु व मात्स्यपुराणांनी मात्र बिंबिसारानंतर अजातशत्रूचें नांव दिलेले आहे व तें बरोबरच आहे. दर्शक हा अजातशत्रूनंतर आला आहे. मात्स्यानें इतर पुराणांत न आढळ- णारी अर्शी दोन नांवें विंध्यसेन ( बिंबिसार ) व अजातशत्रु यांच्यामध्यें दिली आहेत; वंशक ( दर्शक ) यास अजातशत्रु व उदायी यांच्या. मध्यंतरी ठेविलेला आहे. सारांश, पुराणांच्या मतें उदायी हा अजात- शत्रूचा नातू असून बौद्ध व जैन परंपरांच्या मतें हा त्याचा पुत्र होय ! या बाबींत बौद्ध व जैन परंपरांस अधिक मान देणें जरूर आहे. पुराणांतील अनुक्रमांच्या घोंटाळ्यामुळे व बौद्ध व जैन परंपरेच्या सवि- स्तरपणामुळे या वंशाचा अनुक्रम असा ठरवितां येईल:- १९६ १ शिशुनाग. २ शकवर्ण ( काकवर्ण ). ३ क्षेमधर्मा. ४ क्षत्रौजा. ५ दर्शक. ६ बिंबिसार. ७ अजातशत्रु. ८ उदायी. ९ नंदिवर्धन. १० महानंद. ३८ २५ ३३ ४० ४३