पुराणनिरीक्षण. व्यासांपूर्वी पुराणें अनेक नसून तें एकच होतें; व व्यासांनी पुढे त्याची अठरा पुराणे बनविली, हैं उघड दिसतें. ६ व्यासांनी पुराणे कशीं वनविलीं ? व्यासांजवळ पुराणसंहिता बनविण्यास पूर्वीचें काय साधन असावें, सारा चार लक्ष ग्रंथ एकट्या व्यासांनीच रचिला की काय, इत्यादि प्रश्न ओघानेंच उत्पन्न होतात; त्यांचा आपण आतां विचार करूं. व्यासांपूर्वी भारताच्या वेळींही बरेंच पौराणिक वाङ्मय उपलब्ध होतें, हैं खालील उल्लेखांवरून कळून येईल:- 1-- पुराणे हि कथा दिव्या आदिवंशाश्च धीमताम् । कथ्यंते ये पुरास्माभिः श्रुतपूर्वाः पितुस्तव ॥ १-५-२॥ इमं वंशमहं पूर्व भार्गवं ते महामुने । निगदामि यथायुक्तं पुराणाश्रयसंयुतम् ॥ १-५-६॥ यांवरून पुराणांत दिव्यकथा व पूर्वीच्या बुद्धिमानांचे वंश वर्णिलेले असत हैं कळून येतें. तसेंच, वरील पहिल्या उल्लेखांत पुराणाचा एकवचनी प्रयोग आहे हेंही लक्षांत ठेवण्यासारखे आहे; तसेंच, पुराणांत अनेक विख्यात राजांच्या कथा व्यासांच्या वेळी होत्या. पुरुः कुरुर्यदुः शूरो विश्वगश्वो महाद्युतिः । अणुहो युवनाश्वश्च ककुत्स्थो विक्रमी रघुः ॥ २३० ॥ विजयो वीतिहोत्रोंऽगो भवः श्वेतो बृहद्गुरुः । उशीनरः शतरथः कंको दुलिदुहो द्रुमः ३१ ॥ दंभोद्भवः परो वेनः सगर: संकृतिर्निमिः । अजेयः परशुः पुंड्ः शंभुर्देवावृधोऽनघः ॥ ३२ ॥
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१
Appearance